संगमेश्वर ,दिनेश आंब्रे, प्रतिनिधी-
संगमेश्वर तालुक्यातील ओझरखोल गावामधील निटकेवाडी येथिल प्रतिभावान व संगित क्षेत्रात विशेष प्राविण्य मिळवून अग्रगण्य असलेली प्रतिष्ठित नागरीक अजय वाडकर यांची सुकन्या कुमारी गौतमी अजय वाडकर हि गेली १५ वर्षे गायनकलेचा वारसा जपते आहे.
शारदीय नवरायौत्सव हि आनंदाची वतेजाची, उत्साहाची पर्वणी ठरली आहे.श्री देव गणपती मंदिर ( नावडी ),
श्री देवी निनावी मंदिर (भंडारवाडा) तसेच अखंड हरीनाम सप्ताह निमित्त विविध मंदिरात आउन गौतमी अभंग
भावगीत, अभीगीते, जागर, गवळणी,गोंध धार्मिक आध्यात्मीक तसेच पारंपारीक भजने गात आहे.
वडील श्री. अजय वाडकर हे भजनाला जायचे व घरी आल्यानंतर कामाघदयांत ते अभंग गुणगुणायचे
हे ऐकुन ऐकुन कुमारी गौतुमी गायनाची आवड निर्माण झाली. आईसौ, नम्रता अजय वाईकर ये प्रोत्साहन वेळोवेळी प्रोत्साहन देत असत. शास्त्रीय संगित शिकण्यास
गुरु करण्याचे ठरवले .
त्यावेळेस संगमेश्वर मध्ये गायन कला शिकवण्यासा फारश्या सोयी नव्हत्या, त्या वेळेस सौ· दीप्ती अभय गद्रे (गायीका व गुरुवर्य) यांनी जिज्ञासु कृतीच्या बाल गायकांनी शिक्षणाचे धडे दिले व या मेहनती करून गौतमी वाडकर गायनकला उतम शिकली. गायनाचा पाया भक्कम केल्याबद्दल आपल्या पहिल्या गुरु दीप्ती ताई गद्रे यांना वारंवार धन्यवाद देते.
सकाळी ५ वाजता उठून ६ वाजेपर्यंत नियमित गौतमी रियाज करते.
अडीच वर्षाच्या कालावधीत सौ. दिपी मॅडमनी गायनाचा आवाजाचा पाया भक्कम केला. सुरात गाणं हे मला त्यांनी शिकवल हे गौतमी आवर्जून सांगते.गौतमी दुसन्या गुरु सौ,वीणा सतिश कुटे (चिपकूण) यांच्याकडे
3 वर्ष गायन शिकून घेतले. त्यांची शिकवणी फारच अप्रतिम
होती.
शिक्षण घेत असताना बऱ्याच स्पर्धेमध्ये भाग घेतला होता. व उतीर्ण झाली. विना कुठे यांच्याकडे शिकत
असताना प्रवेशिका पूर्ण अशा तीन परीक्षा पास झाल्या.
गौतमीच्या तिसन्या गुरु सौ. विना परब रत्नागिरी या आहेत. त्यांच्याकडे पुढील पूर्ण शिक्षण घेत आहे. गौतमीने जिल्हा जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय अशा विविध स्पधमिध्ये भाग घेऊन प्रथम व द्वितीय क्रमांकाची पारितोषिके विविध राजकीय , सामाजिक व सांस्कृतिक मान्यवरांचे हस्ते
मिळवली आहेत.
वयाच्या १२ या वर्षापासुन गायन सुरुवात केलेल्या गौतमीने
पुढे सिनियर कॉलेज नवनिर्माण कॉलेज लोवले येथे शिक्षण पूर्ण केले आहे. पुढे गायन क्षेत्रात त्यांनी स्वतःला झोकून दिले. रत्नागिरी मध्ये विविध सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये भाग घेऊन प्रेक्षकांची मने तिने जिंकले आहेत. महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये व राज्य बाहेरही देणे अनेक कार्यक्रमांमध्ये भाग घेऊन आपला आवाज प्रेक्षकांसमोर सादर केला आहे. मराठी संगीतातील अनेक प्रसिद्ध व मोठ्या कलाकारांबरोबर काम करण्याची संधी तिला भेटली होती व त्यांच्यासोबत गायन केले आहे. मोहम्मद रफी यांचे चिरंजीव शाहिद रफी यांच्याबरोबर येते ना गायन केले आहे. अनेक रिअल्टी सोसायटी तिने ऑडिशन दिलेले आहेत.
कुठे गायनामध्ये करिअर करण्याची ठरवलेले असून गायनामध्ये काहीतरी वेगळे करून दाखवण्याची तिचा मानस आहे. विश्व समता कला मंच यांचा राज्यस्तरीय प्रज्ञा गौरव पुरस्कार तिला मिळालेला आहे. अनेक पुरस्कार तिला प्राप्त झाले आहेत. आजपर्यंत तिला तिचे आई-वडील यांची मोलाची साथ तिला मिळाले आहे. तबला वादक राहुल कुरधुंडकर व हार्मोनियम वादक पंकज वाडकर यांची मुलाची साथ आजपर्यंत गौतमी वाडकर हिला मिळालेले आहे त्याबद्दल तिने त्यांचे आभार मानले आहेत.