
२२ महिला संघांचा सहभाग; महिलांची विक्रमी गर्दी!,सखी महिला ग्रुप कोंडये आगरवाडी संघ विजेता!!*
संगमेश्वर:- महाराष्ट्राचे उद्योगमंत्री; रत्नागिरी; रायगडचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या सहकार्याने तसेच उदय सामंत फाउंडेशन व शिवसेना तालुका महिला आघाडीच्या माध्यमातून पालकमंत्री ना. उदय सामंत यांच्या मतदार संघातील संगमेश्वर तालुक्यातील फुणगूस पंचायत समिती गणात मंगळागौर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
या स्पर्धेला महिलांनी रिकॉर्ड ब्रेक गर्दी केली होती. २२ संघांनी यामध्ये सहभाग नोंदवला होता.
यामध्ये सखी महिला ग्रुप संघाने घवघवीत यश संपादन करत प्रथम क्रमांक पटकावला आहे.या संघाला दहा हजार रोख रक्कम देऊन गौरव करण्यात आले.
रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्र्याच्या फुणगुस पंचायत समिती गणातील मंगळा गौरी स्पर्धेला ८०० पेक्षा जास्त महिलांनी उपस्थिती लावली होती.
▪️या स्पर्धा दत्तसाई सेवा मंडळ परचुरी येथे घेण्यात आल्या.
या स्पर्धेमध्ये दुसऱ्या क्रमांकाच्या मानकरी जुगाईदेवी महिला झिम्मा फुगडी कळकदेवाडी संघ ठरला या संघाला सात हजार रोख रक्कम आणि मानपत्र देण्यात आले.
▪️तिसरा क्रमांक दत्तासाई ग्रुप परचुरी संघाने मिळवला असुन पाच हजार रोख रक्कम आणि मानपत्र देण्यात आले. यावेळेस उत्तेजनार्थ- गणेश प्रेरणा महिला मंडळ परचुरी निवड झाली त्यांना तीन हजार रुपये पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
▪️या स्पर्धेचे परीक्षक म्हणून भारती चांदोरे, अस्मिता केळकर यांनी काम पाहिले.
कार्यक्रमाच्या अनुषंगाने संगमेश्वर तालुका फुणगुस गणाच्या शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी उपस्थित महिलांसाठी लकी ड्रॉ चे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये उपस्थित सर्व महिलांनी सहभाग घेतला होता त्यापैकी तीन क्रमांक काढून प्रत्येक क्रमांकाला वस्तू स्वरूपात बक्षीस देण्यात आले.
रत्नागिरी तालुक्यातील सर्व महिला ह्या ना. उदय सामंत यांच्या मागे भक्कमपणे उभ्या असून येत्या काळात संगमेश्वर तालुक्यामध्ये महिला संघटना ही मोठ्या प्रमाणात आणि मोठा उत्साहाने काम करुन पालकमंत्री ना. उदय सामंत यांना पाठबळ देतील असा आत्मविश्वास रत्नागिरी महिला तालुका प्रमुख कांचन नागवेकर यांनी व्यक्त केला.तर महिलांच्या हिताचा विचार करणारे सरकार म्हणजे शिंदे – फडणवीस – पवार यांचे सरकार असून त्यांच्या मागे आपण हिंमत देऊन उभे राहावे लागेल. भविष्यात पालकमंत्री ना. उदयजी सामंत हे महिलांसाठी रोजगाराची दालने उभे करतील असे मत जिल्हा संघटक शिल्पा सुर्वे यांनी व्यक्त केले.
आजच्या फुणगूस पंचायत समिती गणाच्या मंगळागौर कार्यक्रमातील उल्लेखनीय बाब म्हणजे, परचुरीमधील एका महिला संघांनी उदय सामंत यांनी परचुरी पुलाची मागणी पूर्ण करून परचुरी ग्रामस्थांची जी अनेक वर्षाची मागणी पूर्ण केली त्यावर एक गाणं सादर करीत पालकमंत्री उदय सामंत यांच्याप्रति कृतज्ञाता व्यक्त केली.
यावेळेस कार्यक्रमाला महिला जिल्हाप्रमुख शिल्पा सुर्वे, उपजिल्हा प्रमुख राजेश मुकादम, तालुका प्रमुख प्रमोद पवार, महिला तालुका प्रमुख कांचन नागवेकर, उपतालुका प्रमुख परशुराम वेल्ये, कसबा जि.प. गट विभाग प्रमुख श्री.महेश देसाई, विभाग संघटक श्री.मनमोहन देसाई हातखंबा विभाग विद्या बोबले, अपर्णा बोरकर, उपविभाग प्रमुख योगेश मुकादम, उप विभाग प्रमुख श्री.विश्वास धावडे, विभागीय कार्यालय प्रमुख श्री. सुरेश दसंम उप विभाग संघटकप्रमुख दिपक लिंगायत, उपविभाग संघटक दिनेश शितप, युवक उपतालुका प्रमुख
सुधीर चाळके, कोंड्ये तंटा मुक्त अध्यक्ष सागर देसाई, युवक विभाग प्रमुख
विश्वास दसम, उप विभाग प्रमुख मुजजमिल मुजावर, महीला विभाग प्रमुख सौ.
,पूनम देसाई, परचुरी सरपंच शर्वरी वेल्ये दीपाली दसम,पल्लवी देसाई
भारती धामणे सरपंच पोचरी, मांजरे सरपंच सचिन मांजरेकर, मेढे सरपंच जयंत देसाई, डिंगणी सरपंच समिना खान, येथील दत्त साई मंडळाचे श्री. सुरेश कलबटे, श्री. दाजी कलबटे, श्री. साई लिंगायत, युवक शाखा प्रमुख श्री. मगेश बोमे, मांजरे शाखा प्रमुख श्री. किरण कुल्ये , कोंड्ये शाखा प्रमुख श्री. शलेश शितप, पोचरी शाखा प्रमुख श्री. अक्षय देसाई वर्षा लिंगायत तसेच पंचक्रोशीतील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, शिवसेनेचे सर्व पदाधिकारी या कार्यक्रमास उपस्थितीत होते.
तसेच नावडी गटातून कार्यक्रमाला भेट देण्यासाठी नावडी गटाचे उप तालुका प्रमुख जमुरथ अलजी, तैमूर अलजी, विनू पाटणे यांनी सुद्धा उपस्थिती दिली.
कार्यक्रम नियोजन बद्ध होण्यासाठी पालकमंत्री यांचे स्वीय्य सहाय्यक दीपक मोरे, आणि वैभव देसाई यांनी मेहनत घेतली.