
खोपोली : खोपोलीमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये खोपोली नगर परिषदेच्या बसमध्ये महिला वाहक आणि एका महिला प्रवाशामध्ये फ्री स्टाईल हाणामारी झाली आहे. या हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. सुटया पैशांच्या वादातून हा राडा झाल्याचे समजत आहे. शेवटी प्रवाशांच्या मध्यस्थीने हा वाद मिटवण्यात आला.
काय घडले नेमके?…
खोपोली नगर परिषदेच्या बसमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे. सुट्या पैशांच्या वादातून प्रवासी महिला आणि महिला वाहक यांच्यामध्ये तुफान राडा झाल्याचे पाहायला मिळाले. या महिलेनं तिकीट काढलं, मात्र वाहक महिलेकडे तिकीटाचे उर्वरित पैसे देण्यासाठी सुटे नव्हते, यावरून सुरुवातीला शाब्दिक बाचाबाची झाली यानंतर दोन महिलांमध्ये जोरदार हाणामारी झाली. यानंतर प्रवाशांनी मध्यस्थी करून हा वाद मिटवला.
पाहा व्हिडिओ..
खोपोलीत बसमध्ये महिला वाहक आणि प्रवाशामध्ये फ्री स्टाईल हाणामारी..
या हाणामारीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. बसमध्ये प्रवासी महिला आणि महिला वाहक यांच्यामध्ये जोरदार राडा सुरू असल्याचं या व्हिडीओमध्ये दिसून येत आहे. शेवटी प्रवाशांच्या मध्यस्थिनं हा वाद सोडवण्यात आला. या व्हिडिओची सर्वत्र चर्चा होताना दिसत आहे.