रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यात वाहनविक्री
प्रकरणात साडेदहा लाखांची
फसवणूक

Spread the love

दबाव वृत्त : निलेश घाग खरेदी केलेल्या मोटारीची रक्कम कर्जदाराच्या वाहनकर्जावर जमा न करता १० लाख ६० हजार रुपयांची फसवणूक करणाऱ्या संशयिताविरुद्ध चिपळूण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नासिर टाके असे संशयिताचे नाव आहे. ही घटना १ ते ३० मे या कालावधीत कामथे येथे घडली.


पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेने
संशयितास मोटार १० लाख ६० हजार रुपयांना विकली होती; मात्र संशयिताने ठरल्याप्रमाणे वाहन खरेदी करताना काढण्यात आलेल्या वाहन कर्जखात्यात रक्कम जमा न करता फिर्यादी महिलेची फसवणूक केली तसेच गाडी परत न करता फिर्यादीचा विश्वासघात करून चारचाकी वाहनाचा अपहार केला. या प्रकरणी महिलने चिपळूण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

जाहिरात

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page