
रत्नागिरी येथील आठवडा बाजार येथे भंगाराच्या साठ्याला आग लागण्याची घटना घडली आहे. सायंकाळी साडेसातच्या सुमारास या ठिकाणी पत्र्याचा आडोसा करून साठा केलेल्या भंगार मालाला आग लागली.
आगीचे वृत्त समजताच नगर परिषद आणि औद्योगिक महामंडळाचे असे दोन बंब धावून आले. या बबानी पाण्याच्या साहाय्याने आग विझवली.
या आगीचे वृत्त समजताच स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच पोलिस धावून आले.
हा भंगार साठा अधिकृत आहे का ? त्यासाठी आवश्यक परवानग्या घेत्तल्या आहेत का या बद्दल खुलासा होऊ शकलेला नाही. परंतु अशा ज्वालाग्राही साठ्याचा शोध प्रशासनाने घेऊन कारवाई करण्याची मागणी होत आहे.