रत्नागिरी : भाजपचे रत्नागिरीचे माजी आमदार बाळ माने यांनी बुधवारी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करत हाती शिवबंधन बांधले आहे.
गेली ४० वर्षे भाजपमध्ये काम करणाऱ्या बाळ माने यांनी १९९९ साली प्रथम विधानसभा निवडणूक लढवली. त्यात ते विजयी झाले. त्यानंतर त्यांचा पराभव झाला तरीही ते पक्षाशी एकनिष्ठ राहिले. शिवाय त्यांना भाजपाने जिल्हाध्यक्षपद दिले आणि ते कार्यरत राहिले.
भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून वारंवार रत्नागिरी मतदारसंघाची मागणी करण्यात आली. परंतु कोकणात भाजपाने २०१९ प्रमाणेच २०२४ मध्ये एकही मतदारसंघ भाजपला दिला नाही. त्यामुळे माने यांनी मातोश्रीवर जाण्याचा निर्णय घेतला. मातोश्रीवर काल पदाधिकाऱ्यांची बैठक झाली व त्यात उद्धव ठाकरे यांनी त्यांची समजूत काढली व आज बुधवारी माने यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्रीवर उद्धव सेनेत प्रवेश केला. या वेळी त्यांच्यासमवेत माजी खासदार विनायक राऊत, सौ. माधवी माने, मुलगे मिहिर व विराज माने, भास्कर जाधव यांचे सुपुत्र समीर जाधव उपस्थित होते.