वनविभागाने रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या तीन वर्षांत ९१४ प्राण्यांना दिले जीवदान…

Spread the love

रत्नागिरी- वनविभाग अथवा आपत्ती व्यवस्थापन विभाग असो, रात्री-अपरात्री मुका प्राणी संकटात सापडल्याचा फोन येतो, तेव्हा ही यंत्रणा वेळ न घालवता तितक्याच तत्परतेने घटनास्थळी पोहोचते आणि मुक्या प्राण्यांचा जीव वाचवते. गेल्या ३ वर्षात तब्बल ९१४ प्राण्यांचा जीव वाचवला गेला, तर ५६ प्राण्यांना जीव मुकावा लागला.

आजही वनविभागाची यंत्रणा वन्यजीव प्राण्यांच्या संरक्षणासाठी सातत्याने प्रयत्न करताना बचाव कार्यासाठी अत्याधुनिक यंत्रणेचा वापरही सुरू केला आहे. जंगलात पाणवठे कमी प्रमाणात असल्याने बऱ्याचदा हे प्राणी पायथ्यालगतच्या गावात येत असतात. त्यातून काही प्राणी भक्ष्य पकडताना विहिरीत किंवा खोल खड्ड्यात अडकण्याचे प्रकार नियमित घडतात. विशेषतः विहिरीत बिबट्या, डुक्कर, रानगवा, सांबर, माकड, मगर असे प्राणी अडकल्याच्या घटना अधूनमधून घडतच असतात. २०२१-२२ मध्ये २३५ मुक्या प्राण्यांना जीवदान देत नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले, तसेच २०२३ मध्ये ४०८ आणि २०२४ मध्ये २७१, असे एकूण ९१४ प्राण्यांचे जीव ३ वर्षांत वाचवण्यात आले. यामध्ये ७२ पाळीव प्राणी, साप व पक्ष्यांचे जीवही वाचवण्यात यश आले.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page