भारतात प्रथमच मोबाईल ॲपद्वारे कुठूनही करा मतदान : जाणून घ्या कसं करावं e SECBHR ॲपद्वारे मतदान?…

Spread the love


भारतात प्रथमच मोबाईल ॲपद्वारे मतदान करता येणार आहे. हे मतदान प्रथम बिहामध्ये होईल. ज्यामुळं देशाच्या लोकशाही प्रक्रियेत एक नवं युग सुरू होणार आहे.


नवी दिल्ली : मोबाइल फोन ॲपद्वारे ई-मतदानाला परवानगी देणारे देशातील पहिले राज्य म्हणून बिहारनं इतिहास रचला आहे. राज्य निवडणूक आयुक्त दीपक प्रसाद यांनी शुक्रवारी सायंकाळी ही घोषणा केली. उद्या, शनिवारी पाटणा, रोहतास आणि पूर्व चंपारण या तीन जिल्ह्यांतील सहा नगरपरिषदांमध्ये मतदान होणार असून, विशिष्ट मतदारांना e SECBHR ॲपद्वारे मतदानाची सुविधा उपलब्ध होईल. ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग व्यक्ती, गरोदर महिला आणि स्थलांतरित मतदारांना या योजनेचा लाभ घेता येईल.

ई-मतदानासाठी नोंदणी-


भारतात प्रथमच मोबाईल ॲपद्वारे मतदान करता येणार आहे. हे मतदान प्रथम बिहामध्ये होईल. ज्यामुळं देशाच्या लोकशाही प्रक्रियेत एक नवं युग सुरू होणार आहे. सहा नगरपरिषदांच्या निवडणुकीत हा पथदर्शी प्रकल्प राबवला जात असून, मतदान केंद्रांवर पोहोचू न शकणाऱ्या मतदारांसाठी ही सुविधा आहे. यामध्ये ब्लॉकचेन तंत्रज्ञान, चेहरा ओळख प्रणाली आणि डिजिटल सुरक्षा यांसारख्या प्रगत तंत्रज्ञानांचा वापर करून मतदान प्रक्रिया सुरक्षित आणि पारदर्शक ठेवण्यात येणार आहे. बिहारचे राज्य निवडणूक आयुक्त दीपक प्रसाद यांनी सांगितलं की, “10,000 मतदारांनी ई-मतदानासाठी नोंदणी केली असून 50,000 मतदारांना मतदान केंद्रावर न जाता मोबाईलद्वारे मतदान करता येईल.”

*ई-मतदान प्रक्रिया कशी कार्य करते:*

*ब्लॉकचेन तंत्रज्ञान:* मतांचे रेकॉर्डिंग सुरक्षित ठेवता येतं, त्यात बदल करता येत नाही.

*चेहरा ओळख प्रणाली:* मतदाराच्या ओळखीची यात खात्री केली जाते.
डिजिटल स्कॅनिंग आणि OCR: मतांची अचूक मोजणी करतं.

*ऑडिट ट्रेल्स:* मतांचा मागोवा ठेवण्यासाठी VVPAT सारखी सुविधा उपलब्ध होते.
डिजिटल लॉक्स:पारंपारिक मतपेट्यांच्या सुरक्षेसाठी अतिरिक्त संरक्षण मिळतं.

*फसवणूक टाळण्यासाठी उपाय:*

एका मोबाईल क्रमांकावरून फक्त दोन मतदार लॉगिन करू शकतात.
प्रत्येक मताची मतदार ओळखपत्राशी पडताळणी केली जाते.

*ई-मतदानासाठी नोंदणी प्रक्रिया:*

1. e-SECBHR ॲप डाउनलोड करा (सध्या फक्त अँड्रॉइडवर उपलब्ध आहे).

2. मतदार यादीत नोंदणीकृत मोबाईल क्रमांकाशी अॅप लिंक करा.

3. पडताळणीनंतर, मतदार राज्य निवडणूक आयोगाच्या वेबसाइटवर किंवा e-SECBHR अॅपद्वारे मतदान करू शकतात.

*ही सुविधा विशेषतः* ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, गर्भवती महिला, स्थलांतरित कामगार आणि गंभीर आजारी मतदारांसाठी उपयुक्त आहे. “ही प्रक्रिया वापरकर्त्यासाठी सोपी असून, नवख्या डिजिटल मतदारांनाही ती सहज समजेल,” असं बिहारचे राज्य निवडणूक आयुक्त दीपक प्रसाद यांनी सांगितलंय.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page