चिपळूणमधील पाच वर्षाच्या चिमुकलीची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद…

Spread the love

*चिपळूण-* पाच वर्षाच्या मुलीची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाल्याने सर्वच स्तरातून या चिमुकलीचं कौतुक केलं जात आहे. सोनाक्षी कल्याणी विनीत मेहता या पाच वर्षाच्य़ा मुलीने “इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड” सन 2025 मध्ये आपली नोंद करत यंगेस्ट आयबीआर अचिव्हर हा बहुमान पटकावला आहे. तिच्या असामान्य बुद्धिमत्ता व कौशल्यामुळे ती सर्वात लहान वयातच फळ आणि आरोग्याची माहिती असणारी, आरोग्यासाठी फळांचा योग्य सल्ला देणारी ती एक मार्गदर्शकच बनली आहे. तिच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत असून भाजपा चिपळूण शहर चिटणीस सौ. प्रणाली अविनाश सावर्डेकर यांनी तिचे विशेष कौतुक केले आहे.

सोनाक्षी हिने 76 सामान्य ज्ञान प्रश्नांची उत्तरे देताना, 35आरोग्यविषयक समस्या आणि त्यावरील फळांद्वारे नैसर्गिक उपाय, 22 फळे व भाज्यांचे फायदे, 3 वनस्पती आणि 16 वास्तुशास्त्र विषयक प्रश्न यशस्वीपणे उत्तरले आहेत. याशिवाय तिने 29 फळे आणि २६ क्रियापदे ओळखून सांगण्याचा विक्रम केला आहे. तसेच तिने 7 संस्कृत श्लोकांचे पठण आत्मविश्वासाने सादर केले असून, तिच्या वयाच्या इतर मुलांच्या तुलनेत सोनाक्षी सर्वच बाबींमध्ये उल्लेखनीय आहे, हे या सामान्य ज्ञानाच्या परीक्षेतून दिसून येत आहे असं परीक्षकांनी म्हटलं आहे. सोनाक्षीला लहान वयातच मिळाणाऱ्या या यशााचं श्रेय तिच्या पालकांना जातं. तिच्या यशाबद्दल भाजपा चिपळूण शहर चिटणीस सौ. प्रणाली सावर्डेकर यांच्याकडून विशेष कौतुक देखील केलं आहे.

रायगडची सुकन्या सध्या चिपळूणमध्ये शिकणानिमित्त वास्तव्यास आहे. सोनाक्षीची आई कल्याणी विनीत मेहता या “बाल आणि युवा विकास प्रशिक्षक” असून सोनाक्षी ब्रेन डेव्हलपमेंट अकॅडमी, चिपळूणच्या त्या संस्थापक आहेत. ब्रेन ॲण्ड माईंड फिटनेस या उपक्रमा अंतर्गत मुलांचे खेळ तसंच ध्यानाच्या माध्यमातून शारीरिक, बौद्धिक व मानसिक विकास घडवून आणण्याचं काम कल्याणी मेहता करत असतात. सोनाक्षीचे वडील विनीत नंदकुमार मेहता हे एबी मौरी एमएनसी कंपनीमध्ये डेप्युटी मॅनेजर म्हणून कार्यरत आहेत. सोनाक्षीच्या नवनवीन शिकण्याच्या, पुस्तक वाचनाच्या तसेच ध्यानाच्या सवयीमुळे तिने हे मोठे यश मिळवले आहे. तिच्या या यशाबद्दल तिचे सर्वत्र अभिनंदन आणि कौतुक होत आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page