खेड येथील रस्त्यावर उभ्या असलेल्या डंपरलापिकअपची धडक ; पाचजण जखमी

Spread the love

खेड :- तालुक्यातील हेदली गावानजीक खेड – खोपी मार्गावर क्रिकेट खेळण्यासाठी खेळाडूंना घेऊन निघालेल्या पिकअपची रस्त्यावर उभ्या असलेल्या डंपरला धडक बसली आहे . या अपघातात एकजण गंभीर जखमी असून पाचजण किरकोळ जखमी आहेत .
खेड – खोपी मार्गावर रविवारी दि . २८ रोजी दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास पिकअप गाडीतून ( एमएच ०८ एपी ५४९१ ) मध्ये १५ तरुण क्रिकेट खेळण्यासाठी जात असताना हेदली या ठिकाणी जाताना पिकअपचालकाचे नियंत्रण सुटून तो डंपर ( एमएच ०९ आयपी ९५८१ ) वर धडकला . या अपघातात अथर्व अजित जाधव ( १४ ) , राज दिलीप बुरटे ( १४ ) , सोहम प्रदीप बुरटे ( १७ ) , यश दिनेश बुरटे ( १७ ) , दिनेश दिलीप कानेकर ( ३२ ) हे जखमी झाले . सर्व जखमी तरुण खेडमधील वेरळ या गावातील असल्याचे समजते .

जाहिरात

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page