हैदराबादमध्ये रुग्णालयाच्या इमारतीला भीषण आग; अनेकजण इमारतीत अडकल्याची भीती; अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू..

Spread the love

हैदराबाद- हैदराबादमध्ये एका रुग्णालयाच्या इमारतीला भीषण आग लागली आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाकडून शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

हैदराबादमधील अंकुरा रुग्णालयाच्या इमारतीला ही आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. ही आग नेमकी कशामुळे लागली? याची माहिती मिळू शकलेली नाही. मात्र, शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. इमारतीच्या १० व्या मजल्यावर प्लास्टिकचे साहित्य होते आणि त्यामुळे आग झपाट्याने पसरली असल्याचं बोललं जात आहे. घटनास्थळी मदत – बचावकार्य मोठ्या वेगाने सुरू आहे.

इमारतीच्या ५ व्या मजल्यापासून ते १० व्या मजल्यापर्यंत आग पसरली आहे. आग इतकी मोठी आहे की, दूरवरुनच आगीचे लोळ आणि धुराचे लोट दिसत आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अंकुरा रुग्णालयात गर्भवती महिला आणि लहान मुलांवर उपचार होतात. रुग्णालयाच्या इमारतीमधून नेमक्या किती रुग्णांना आणि स्टाफला बाहेर काढण्यात आले आहे याबाबतची माहिती अद्याप समोर आलेली नाही. आग खूपच झपाट्याने पसरत आहे. आगीचे लोळ आणि धुराचे लोट पाहून आग किती भीषण आहे याचा अंदाज वर्तवता येऊ शकतो. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. तसेच इमारतीमधील कुणीही रुग्ण, रुग्णालयाचा स्टाफ आणि इतर नागरिकांना बाहेर काढण्यासाठी सुद्धा प्रयत्न सुरू आहेत.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page