फिटनेससाठी लाइफस्टाइलमध्ये कोणते बदल करणं ठरेल लाभदायक? जाणून घ्या..

Spread the love

व्यायामाला पर्याय नाही

व्यायामाला शॉर्टकट नसतो. व्यायाम करण्यासाठी पुरेसा वेळ देता येत नाही अशी तक्रार बरेच जण करतात. कमी वेळेत जास्तीत जास्त शारीरिक हालचाल करण्यासाठी एचआयआयटी वर्कआउट तुम्हाला नक्कीच मदत करेल. एका संशोधनाअंती सिद्ध झालं आहे की, आठवड्यातून तीन वेळा दहा मिनिटांसाठी एचआयआयटी व्यायाम केल्यास फायदेशीर ठरू शकतं.

सकस आहार आवश्यक

उत्तम आरोग्यासाठी पोषक आहाराचं सेवन करणं आवश्यक आहे. शरीराच्या वाढीसाठी महत्त्वाच्या असणाऱ्या घटकांचं सेवन करणं आवश्यक आहे. यासोबतच शरीरात गेलेल्या पोषणद्रव्यांचं योग्य प्रकारे पचन होणंही तितकंच गरजेचं आहे. उदा. ‘क’ जीवनसत्व शरीरातील लोहाचं पचन होण्यासाठी मदत करतं. लोहयुक्त पदार्थ खाल्ल्यानंतर ‘क’ जीवनसत्व भरपूर प्रमाणात असणाऱ्या संत्र्याच्या रसाचं सेवन करावं. चरबीयुक्त पदार्थांचं विघटन करण्यासाठी ‘अ’, ‘ड’, ‘इ’ आणि ‘क’ जीवनसत्व मदत करतात. म्हणूनच आहारतज्ज्ञ जेवणात तेलाचं ड्रेसिंग असणारी कोशिंबीर आणि फळं खाण्याचा सल्ला देतात.

श्वसनक्रिया सुरळीत होण्यासाठी

पोटाचे व्यायाम केल्यानं पोटाच्या स्नायूंसोबतच फुफ्फुसांचंही आरोग्य उत्तम राहण्यास मदत मिळते. पोटाचे व्यायाम करताना दीर्घ श्वास घेतला जातो, ज्याचा फुफ्फुसांना फायदा होतो. श्वसनाचे विकार असणाऱ्यांसाठी योग करणं फायद्याचं ठरू शकतं. श्वसनाचे व्यायाम केल्यानं रक्तातील ऑक्सिजनची पातळी व्यवस्थित राहते. शिवाय रक्तदाब आणि हृदयाचे ठोके नियंत्रित राहण्यासाठी मदत होते.

स्क्रीनटाइमवर असावं नियंत्रण

अतिरिक्त स्क्रीनटाइम डोळ्यांच्या आजारांना आमंत्रण देऊ शकतं. दिवसभरात इतर व्यायामासोबतच डोळ्यांचे सुद्धा व्यायाम करणं आवश्यक आहे. डोकेदुखीची समस्या सतावणाऱ्या लोकांनी डोळ्यांचे नियमित व्यायाम करायला हवे. यासोबतच डोळ्यांना ताण जाणवत असल्यास डोळे काही सेकंदासाठी बंद करा अथवा हिरवळीकडे बघा.

दीर्घकाळ बसून राहणं वृद्धत्वाला आमंत्रण देऊ शकतं, असं एका संशोधनातून सिद्ध झालं आहे. ऑफिसमध्ये काम करताना आपण किती वेळ बसून राहतो हे मोजता येणं अशक्य आहे. बसून काम करताना प्रत्येक तीस मिनिटांनी उभं राहून शरीराची हालचाल केल्यास संभाव्य धोके टाळता येऊ शकतात, असं कोलंबिया युनिव्हर्सिटीतील शास्त्रज्ञ नमूद करतात.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page