महाविकास आघाडीतील जागावाटपाचा तिढा सुटला आहे. कोण किती जागा लढवणार हे जवळपास निश्चित झालं आहे. लवकरच तिन्ही पक्ष उमेदवार जाहीर करण्याची शक्यता आहे.
अखेर महाविकास आघाडीचं ठरलं! काँग्रेस १०५, ठाकरे ९५, शरद पवार ८५ जागांवर लढणार, लवकरच होणार यादी जाहिर…
*मुंबई /प्रतिनिधी –* महाविकास आघाडीतील जागावाटपाचा तिढा सुटला आहे. कोण किती जागा लढवणार हे जवळपास निश्चित झालं आहे. लवकरच तिन्ही पक्ष उमेदवार जाहीर करण्याची शक्यता आहे.
महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा तिढा सुटला आहे. कोण किती जागा लढणार हे जवळपास निश्चित झाले आहे. काँग्रेस व शिवसेनेत (ठाकरे) गटात जागावाटपावरून निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या नेत्यांची मंगळवारी बैठक झाली. या बैठकीत काँग्रेस १०५, शिवसेना (ठाकरे) ९५ तर राष्ट्रवादी (शरद पवार) ८५ जागा लढविण्यावर सहमत झाल्याची माहिती आहे. दरम्यान, चार ते पाच जागांचा तिढा अद्याप कायम असून यावरून काँग्रेस व शिवसेना उद्धव गटात धुसफूस सुरू असल्याची माहिती आहे.
महाविकास आघाडीच्या जागावाटप ठरवण्यासाठी महत्वाच्या नेत्यांची मंगळवारी मुंबईतील एका मोठ्या हॉटेलतात बैठीक घेण्यात आली. तब्बल चार ते पाच तास या बैठीकीत जागा वाटपावरून चर्चा झाली. गेल्या बैठकीत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यात जागा वाटपावरून वाद झाला होता. यानंतर दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये झालेल्या चर्चेनंतर मंगळवारी पुन्हा बैठक घेण्यात आली होती. या बैठीकीत बऱ्यापैकी जागांवर सहमति झाली आहे.
शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज बुधवारी पत्रकार परिषद घेऊन जागावाटपाची घोषणा केली जाईल, अशी माहिती दिली. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, २८८ सदस्यांच्या विधानसभेसाठी काँग्रेस १०५, शिवसेना (यूबीटी) ९५ आणि राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) ८४ जागा लढवणार असल्याचं निश्चित झालं आहे. तर उर्वरित जागा युतीतील छोट्या पक्षांना दिल्या जाणार आहेत.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यात जागावाटपावरून झालेल्या वादानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, अध्यक्ष शरद पवार आणि तत्कालीन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यानंतर थोरात आणि महाविकास आघाडीच्या इतर नेत्यांची पुन्हा भेट झाली. या बैठकीबद्दल माहिती देतांना थोरात म्हणाले की, पाच तासांहून अधिक काळ ही बैठक चालली. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी त्यांना पवार आणि ठाकरे यांची भेट घेण्यास सांगितले होते.
काही जागांवरील तिढा कायम …
मुंबई शहरी मतदारसंघात उद्धव यांची शिवसेना १८, काँग्रेस १४ आणि राष्ट्रवादी काँग्रेस २ जागा लढवणार आहे. मात्र, मुंबईतील वर्सोवा, वांद्रे पूर्व आणि भायखळा या तीन जागांवरील वाद अद्याप सुटलेला नाही, कारण उद्धव गट आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी या जागांवर दावा केला आहे. मात्र, त्यावरही आज अंतिम निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यात काँग्रेस किंवा शिवसेनेला काही जागांचा त्याग करावा लागू शकतो.
दुसरीकडे सत्ताधारी महायुतीतील जागावाटपही अंतिम टप्प्यात आहे. भाजप १५० ते १५५, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना ७८ ते ८० आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी ५२ ते ५४ जागा लढवू शकतात. महाराष्ट्र विधानसभेच्या एकूण २८८ जागा आहेत. संपूर्ण राज्यात २० नोव्हेंबर ला एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. मतमोजणी २३ नोव्हेंबर ला होणार आहे.