
दबाव. प्रतिनिधी, मुंबई : अंधेरीतील धोकादायक गोखले पुलाचे पाडकाम शेवटच्या टप्प्यात आले आहे. या पुलाचे पाडकाम पूर्ण करण्यासाठी पश्चिम रेल्वेने उद्या, शनिवारी रात्री आठ तासांचा विशेष वाहतूक ब्लॉक घोषित केला आहे. या ब्लॉकमुळे शनिवारी रात्री ११.१५ वाजता सुटणारी विरार-चर्चगेट ही शेवटची जलद लोकल असणार आहे. बोरिवलीहून चर्चगेटसाठी शेवटची धीमी लोकल रात्री ११.३४ वाजता रवाना होणार आहे.
पश्चिम रेल्वेद्वारे गोखले पुलाचे काम सुरू आहे. पुलावरील शेवटचे गर्डर हटवण्यासाठी पाचवी मार्गिका आणि फलाट क्रमांक ९वरील रेल्वे मार्गिकांवर शनिवारी रात्री साडेनऊ वाजल्यापासून ते रविवारी पहाटे साडेपाच वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात येणार आहे. दरम्यान, शनिवारी रात्री १२.१० ते रविवारी पहाटे ४.४० पर्यंत फलाट क्रमांक ४ वरील अप धीम्या आणि अप-डाउन जलद मार्गांवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. धीम्या आणि जलद मार्गावरील ब्लॉकमुळे काही अप लोकल फेऱ्या गोरेगाव स्थानकापर्यंत चालवण्यात येतील. प्रवाशांच्या सुविधेसाठी गोरेगाव स्थानकातील फलाट क्रमांक १ आणि २वरून विशेष लोकल फेऱ्या चालविण्यात येणार आहेत.
– विरार ते चर्चगेट जलद- रात्री ११.१५ वाजता विरारहून सुटेल आणि चर्चगेटला मध्यरात्री ००.४२ वाजता चर्चगेटला पोहोचेल.
– वसई रोड ते अंधेरी धीमी – रात्री ११.१५ वाजता वसई रोडहून सुटेल आणि अंधेरीला रात्री १२.०४ वाजता पोहोचेल.
– बोरिवली ते चर्चगेट धीमी – रात्री १३.३४ वाजता बोरिवलीहून सुटेल आणि चर्चगेटला रात्री १२.३९ वाजता पोहोचेल.
