वर्तकनगर भागात दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यावर चाकूने हल्ला केल्याचा प्रकार गुरुवारी उघडकीस आला आहे.
ठाणे : दबाव वृत्त येथील वर्तकनगर भागात दहावीत शिकणाऱ्या एका मुलावर चाकूने हल्ला केल्याचा प्रकार गुरुवारी उघडकीस आला आहे. वर्तकनगर भागातील मराठी माध्यमाच्या शाळेत तो शिकत असून परिक्षेवरुन येताना त्याच्यावर हल्ला झाला. या भागातील खासगी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु आहेत. मुलीच्या प्रकरणातून हा हल्ला झाल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. याप्रकरणी वर्तक नगर पोलिसांकडून अधिक तपास सुरु आहे.