दिवा (प्रतिनिधी ) दिवा प्रभाग समिती हद्दीत वाढत चाललेल्या अनधिकृत इमारतींचे बेकायदा बांधकामांना आवर न घालता आल्यामुळे शेवटी महापालिका आयुक्त श्री अभिजीत बांगर यांनी येथील सहाय्यक आयुक्त फारुख शेख यांना आज निलंबित केले आहे.महापालिका आयुक्त श्री बांगर यांनी सूचित केल्यानंतरही दिव्यात अनधिकृत बांधकामे सतत चालू राहील्यामुळे ही त्यांच्यावर कारवाई करण्यासारखी परिस्थिती आल्याचे समजते आहे.
ठाणे शहराच्या आयुक्तपदी नवी मुंबईचे तत्काली आयुक्त अभिजीत बांगर यांनी ठाणे महानगरपालिकेची सुत्रे हातात घेताच येथील नागरी समस्यांना वाचा फोडण्यास सुरवात केली आहे.शहराचे सुशोभिकरण करण्याचे कामही त्यांनी हाती घेतले आहे.तसेच जर ठाणे शहरात बेकायदा बांधकामे केली तर त्यांना कोणतेही अभय दिले जाणार नाही असे सुचित केले होते.मात्र तरीही दिवा प्रभाग समिती हद्दीत विविध ठिकाणी बेकायदा बांधकामे सुरु होती.याबाबत विविध सामाजिक संघटना आणि राजकीय पक्षांच्या तक्रारीनंतर आज येथील प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त फारुख शेख यांना निलंबित करण्यासारखी परिस्थीती येवून गेली आहे.त्यामुळे या कारवाईनंतर पुढे जर का बेकायदा बांधकामे होणार असतील तर त्यांना कोणतेही अभयदान देण्यात येणार नसल्याचेच या कारवाईच्या माध्यमातून आयुक्त श्री अभिजीत बांगर यांनी संदेश दिला आहे.