▪️ कोकण हापूस आंबा उत्पादक विक्रेते सह. संस्था मर्या., रत्नागिरी आणि ओबीसी संघर्ष समन्वय समिती यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार दि. २६ जानेवारी २०२३ रोजी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून शेतकरी भूमिपुत्रांच्या न्याय्य हक्कांसाठी शेतकरी धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. सकाळी १०:०० ठीक वा. छत्रपती शिवाजी महाराज चौक, मारुती मंदिर, रत्नागिरी ते जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हजारोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांमार्फत करण्यात येत आहे.
▪️ या आवाहनात, सन २०१५ कोकणातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिकूल, खराब हवामान, अवेळी पाऊस पडणे, वादळी वार, कोरोना संकट व वाढीव वीज बिल या कारणांमुळे मोठा आर्थिक फटका बसत असून यावर्षी सुद्धा वातावरणातील सतत होणाऱ्या बदलांमुळे व सतत पडणाऱ्या पावसामुळे मोहर अत्यल्प प्रमाणात आला आहे. आणि मोहर येण्याचा कालावधीही संपत आलेला आहे. नंतर मोहर आलेल्या आंब्याला कादिमोल भाव मिळतो.
▪️ आंबा, काजू, नारळ, सुपारी हे कोकणातील शेतकऱ्यांचे मुख्य पिक असून कोकणची अर्थव्यवस्था या पिकांवर अवलंबून आहे. शेतकऱ्यांच्या या समस्यांकडे लोकप्रतिनिधी व राज्यकर्ते दुर्लक्ष करत आहेत. त्यांचे लक्ष वेधण्यासाठी ‘शेतकरी धरणे आंदोलन’ आयोजित करण्यात आले आहे. तरी कोकणातील आंबा बागायतदारांची कर्जमुक्ती करून आत्महत्या करण्यापासून वाचवावे. तसेच ७/१२ कोरा करून शेतकऱ्यांना व्यवसायात पुन्हा एकदा जोमाने उभे करण्यासाठी कर्जरूपी आर्थिक सहकार्य करावे.