गणपतीपुळे ,प्रतिनिधी- फिल्मसिटीमधील प्रसिद्ध उद्योजक तथा दानशूर व्यक्तीमत्व आणि मालगुंड गावचे सुपुत्र सुरेंद्र, जितेंद्र शिवराम साळवी यांनी नुकतीच मालगुंड ग्रामपंचायतीला सदिच्छा भेट दिली.
या भेटीत त्यांनी मालगुंड ग्रामपंचायतीला मोठी वस्तूरूप दिली आहे. दानशूर व्यक्तिमत्व तथा फिल्मसिटी मधील प्रसिद्ध उद्योजक असलेल्या सुरेंद्र, जितेंद्र शिवराम साळवी यांनी आपल्या मालगुंड गावातील प्राथमिक शाळांना भेटी देऊन शालेय विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे शैक्षणिक साहित्य मोठ्या प्रमाणात दिले आहे .
तसेच समाजातील विविध गरजू व्यक्तींना व होतकरू शालेय विद्यार्थ्यांना ते नेहमीच मदतीचा हात देत असतात.
त्यामुळे त्यांचे दानशूरपणाचे व्यक्तिमत्व सर्वदूर पोहोचले आहे. तसेच सामाजिक कार्यात त्यांचा नेहमीच सहभाग असल्याने विविध ठिकाणच्या सामाजिक संस्था, संघटनेचे सामाजिक कार्य अधिकाधिक प्रगतीपथावर नेण्यासाठी सुरेंद्र, जितेंद्र साळवी यांचा मोठा वाटा असल्याचे दिसून आले आहे. त्यांच्या उत्तुंग दातृत्वाची दखल घेऊन मालगुंड ग्रामपंचायतीच्या वतीने त्यांचा यथोचित सन्मान सरपंच श्वेता खेऊर यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी मालगुंडचे उपसरपंच संतोष चौगुले, सर्व ग्रामपंचायत सदस्य युवा नेते साईनाथ जाधव, सामाजिक कार्यकर्ते दशरथ साळवी,बावा आग्रे; संजय दुर्गवळी,दिनेश गोणबरे आदी मान्यवर व स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.