
पंचांगानुसार फाल्गुन हा हिंदू वर्षाचा शेवटचा महिना आहे. हा महिना फेब्रुवारी आणि मार्चमध्ये येतो. फाल्गुन पौर्णिमेच्या दिवसाला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. हिंदू धर्मग्रंथांमध्ये फाल्गुन पौर्णिमेचे महत्त्व सांगितले आहे. दर महिन्याला पौर्णिमा व्रत पाळले जाते, पण फाल्गुन पौर्णिमेला विशेष महत्व आहे.
या दिवशी होलिका दहनही केले जाते. फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी भगवान विष्णूंनी आपला भक्त प्रल्हाद याचे रक्षण केले आणि होलिकाला जाळून राख केली. या दिवशी लक्ष्मी जयंतीचा सणही साजरा केला जातो. दुसरीकडे, पौर्णिमेची तारीख चंद्र देवाशी संबंधित असल्याचे मानले जाते. या दिवशी जो व्रत करून भगवान विष्णूची पूजा करतो, त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. चला जाणून घेऊया तिथी, आणि उपाय…
फाल्गुन पौर्णिमा २०२३ तिथी
फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमा तिथीची सुरुवात: ०६ मार्च, सोमवार, संध्याकाळी ०४:१६ वाजता
फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षाची पौर्णिमा समाप्ती: ०७ मार्च, मंगळवार, संध्याकाळी ०६:०८ वाजता
उदयतिथीनुसार फाल्गुन पौर्णिमेचे स्नान व दान ०७ मार्च रोजी होईल.
फाल्गुन पौर्णिमेला हे उपाय करा
धार्मिक मान्यतेनुसार माता लक्ष्मीचा अवतार फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी झाला होता. या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूची पूजा करावी.
फाल्गुन पौर्णिमेच्या रात्री चंद्राची पूजा केल्याने आरोग्य लाभते आणि त्याचबरोबर आर्थिक अडचणींपासून मुक्ती मिळते असे मानले जाते.