
मुंबई :- जात पडताळणी प्रमाणपत्र काढण्यासाठी सर्वसामान्यांना अनेकदा अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे जात पडताळणी प्रक्रिया ऑनलाईन करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. त्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
ऑफलाईन कामे करत असताना, काही वेळेला काही शासकीय कर्मचारी किंवा अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले तर संबंधित फाईल तशीच जागेवर पडून राहते. मात्र ऑनलाईन अर्ज केला आणि किती दिवस आपले काम झाले नाही ते लगेच कळून येते. ऑनलाईन असल्यामुळे सगळ्या गोष्टी पारदर्शकपणे समजतात. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी जात पडताळणी प्रक्रिया ऑनलाईन करा, असे आदेश दिले आहेत. आता नजीकच्या काळात त्याचा सकारात्मक परिणाम पडलेला बघायला मिळू शकतो. सह्याद्री अतिथीगृह येथे सामाजिक न्याय विभागाच्या पुढील १०० दिवस आराखड्याच्या अनुषंगाने मुख्यमंत्री फडणवीस यांनी आढावा घेतला. त्यावेळी त्यांनी जात पडताळणी प्रक्रिया ऑनलाईन करण्याचे आदेश दिले.