
ठाणे; निलेश घाग ठाणे भिवंडी येथील यंत्रमाग उद्योग संकटात सापडला आहे. त्यामुळे ऐन दिवाळीत, १ ते २० नोव्हेंबर असे तब्बल २० दिवस शहरातील यंत्रमाग बंद ठेवण्याचा निर्णय उद्योजकांनी घेतला आहे. केंद्र आणि राज्य सरकारने यंत्रमाग उद्योगाकडे लक्ष देणे आवश्यक आहे अशी त्यांची मागणी आहे.

यंत्रमागाचे शहर अशी भिवंडीची ओळख आहे. शहरातून कच्चा कापड, तयार कापड यासह कापडी वस्तूंची मोठय़ा प्रमाणात निर्यातही होते. एका यंत्र मागावर दररोज सरासरी ५० ते ८० मीटर कापड तयार होते. मात्र जागतिक मंदीच्या सावटामुळे निर्यात पूर्ण क्षमतेने होणे अवघड झाले आहे. त्यामुळे कारखानदार भारतीय बाजारपेठांमध्ये कापडाची विक्री करत आहेत. मात्र चीन, व्हिएतनाम, बांगलादेश, इंडोनिशिया, मलेशिया, थायलंडसह अन्य देशांतून कापड भारतीय बाजारांत येत आहे. परिणामी, भिवंडीतील कापडाची मागणी घटली आहे.
कारखाना सुरू ठेऊन तोटा वाढविण्यापेक्षा यंत्रमाग बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ‘व्यापारी एकता ग्रुप’ या संघटनेची नुकतीच बैठक झाली. भिवंडीतील ७०० यंत्रमाग मालक यावेळी उपस्थित होते. या बैठकीत कापडाच्या ओझ्या खाली यंत्रमागांची घुसमट १ ते २० नोव्हेंबर या कालावधीत यंत्रमाग बंद ठेवण्याचा निर्णय झाल्याचे यंत्रमाग व्यवसायिक सरोज फक्की यांनी सांगितले.
जाहिरात



