एजाज पटेल/संगमेश्वर- संगमेश्वर येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण (आय. टी. आय ) च्या इमारतीच्या स्वच्छतेकडे येथील व्यवस्थापनाचे दुर्लक्ष असल्याने सर्वत्र घाणीचे साम्राज्य आणि पोट ढवळून येणारी ओकारी आल्याशिवाय राहणार नाही . अशा सर्वत्र पसरलेल्या दुर्गधित प्रशिक्षणासाठी येणाऱ्या विध्यार्थ्यांना वावरावे लागत आहे. साहजिकच विध्यार्थ्यांना रोगराईच्या खाईत लोटून सुरु त्यांच्या जीवाशी जीवघेणा खेळ खेळ जात आहे असे म्हटल्यास वावगेच ठरणार ठरणार नाही. मात्र प्रशिक्षण घेणाऱ्या विध्यार्थ्यांना घाण व दुर्गधी मुळे नव्हे तर शिक्षकांच्या भीती मुळे तोंड बंद व नाक दाबून निमूटपणेच वावरावे लागत आहे.
स्वच्छतागृहात केरकचरा व घाणीचे साम्राज्य
▪️इमारतीच्या तळमजल्यावर लेडीज आणि जेन्टस साठी असलेल्या स्वच्छता गृहातील केरकचरा तसेच घाणीचे साम्राज्य पाहून आठवडा, महिना नव्हे तर कित्येक वर्ष या स्वच्छतागृहांच्या स्वच्छतेकडे पाठ फिरवले असल्याचेच दिसून येत आहेत. तर मजल्यावर असलेल्या स्वच्छतागृहाची सुद्धा सेम टू सेम अवस्था आहे.अस्वच्छता आणि घाणीच्या साम्राज्यामुळे संपूर्ण इमारतीत दुर्गधी चा घमघमाट पसरला आहे.
वर्ग आणि अन्य खोल्यात सुद्धा घाणीचे साम्राज्य
स्वच्छते पासून दुर्लक्षित असलेल्या येथील वर्ग खोल्या व अन्य खोल्या सुद्धा घाणीच्या कचाट्यातच असून रोगराईला निमंत्रण देणाऱ्या येथील जाल तेथे केरकचरा घाणीचे दर्शन आणि दुर्गधी चा घमघमाट असल्याने येथील स्थानिक व्यवस्थापण कसे वावरतात असा प्रश्न उपस्थित झाल्या शिवाय राहणार नाही.
आजूबाजूच्या परिसरात गवतासह झाडेझूडपे
इमारतीच्या आसपासच्या भागात गवत आणि झाडे झूडपे वाढल्याने सरपटणारे प्राणी, विचुं आदी विषारी इजा पोचवणाऱ्या किटकांचा पासून धोका होऊ शकतो याची कल्पना येथील व्यवस्थापनाला कोण सांगणार. एखादी तशी दुर्घटना घडल्यावर यांना जाग येईल का?
दशक पूर्ण न झालेल्या इमारतीची दुर्दशा
शासनाचा पाण्यासारखा पैसा ओतून उभारण्यात आलेल्या इमारतीला एक दशक पूर्ण झालेले नसताना काही ठिकाणी दिसून येणारे तडे, इमारतीला सर्वत्र लागलेली पाण्याची गळती अशा खोल्यांमध्ये विद्यार्थ्यांना अक्षरशः जीव मुठीत घेऊन वावरावे लागत आहे. काही वर्गात तर स्लॅब मधून येणाऱ्या पाण्यामुळे वर्ग खोळी की पाण्याचे तळे असे चित्र असलेल्या वर्गात विध्यार्थी प्रशिक्षणासाठी बसत आहेत.
शासकीय औद्योगिक प्रशिक्षण इमारत की, रोगराई पसरवणारे केंद्र
एकीकडे शासन स्वछ भारत अभियान सुरु करून लोकांचे आरोग्य सुधारण्याकडे लक्ष देत असताना दुसऱ्या बाजूला शासकीय इमारत असलेल्या या ठिकाणी घाणीचे साम्राज्य, दुर्गधी या मुळे माशांची उत्पत्ती होऊन मलेरिया, डेंग्यू सारखे विविध प्रकारच्या रोगराईला सहजपणे निमंत्रण देण्यासारखे आजार फैलावले जाऊन नाहक विध्यार्थ्यांना त्याचा नाहक सामना करावा लागण्याची वेळ येऊ शकते. याची गांभीर्याने त्वरित सबंधित वरिष्ठ विभाग तसेच लोकप्रतिनिधिनी घेण्याची मागणी होत आहे.