
रत्नागिरी: रत्नागिरी रेल्वेस्थानकावरील फुडस्टाॅल व पार्किंग व्यवस्थेवरील परप्रांतीयांची मक्तेदारी बंद करण्यासाठी आज रत्नागिरी तालुका मनसेच्या वतीने स्टेशन अधिक्षक श्री. भूपेंद्र कोवे यांना निवेदन देण्यात आले. येथील फुडस्टाॅल हे स्थानिक मराठी व्यक्तीच्या नावे आहेत परंतु प्रत्यक्षात मात्र ते परप्रांतीयांकडून मनमानी पद्धतीने चालवले जातात हे फुडस्टाॅल स्थानिक मराठी माणसाकडूनच चालवले जावेत तसेच रेल्वेस्थानकावरील पार्किंग दरसुद्धा “हम करेसो कायदा” या पद्धतीने घेतले जातात याचा तात्काळ बंदोबस्त करा अन्यथा मनसे पद्धतीने समज दिली जाईल असा इशारा रेल्वे प्रशासनाला यावेळी देण्यात आला .
याप्रसंगी संबंधित रेल्वे अधिकाऱ्यांशी चर्चा करताना मनसेकडून रत्नागिरी तालुकाध्यक्ष श्री.रूपेश जाधव, मनसे नाविक सेना जिल्हाचिटणीस श्री. बिपीन शिंदे, तालुका उपाध्यक्ष श्री. रूपेश चव्हाण, श्री. सौरभ पाटील, विभाग अध्यक्ष श्री. अखिल शाहू, श्री. सोम पिलणकर, श्री. संदीप सुर्वे आदी पदाधिकाऱी उपस्थित होते.
जाहिरात

