दिव्यात अनधिकृत बांधकामाच्या कारवाईला वेग आयुक्तांच्या कडक सूचनेनंतर, अतिक्रमणे जमिनदोस्त

Spread the love

ठाणे: निलेश घाग ठाणे महापालिका हद्दीतील वेगवेगळ्या स्थितीतील अनधिकृत बांधकामे, प्रशासकीय यंत्रणा म्हणून आपल्यासाठी भूषणावह नाहीत, अनधिकृत बांधकाांबाबत यंत्रणेने सोयीस्कर दुर्लक्ष करायचे ठरवले आहे का, अशा परखड शब्दांत ठाणे महापालिका आयुक्त यांनी तीन आठवड्यांपूर्वी प्रशासनातील अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले होते.

एकट्या दिवा प्रभाग समितीच्या हद्दीत या काळात पाच ते सहा ठिकाणी अनधिकृत बांधकामांवर मोठी कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये इमारती, गाळे, मोकळ्या जागेतील अतिक्रमणे जमीनदोस्त करण्यात आली.

अनधिकृत बांधकामांवर कारवाई करावी, असे आदेश दिले. त्यानंतर ठाणे पालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी प्रशासनाची तातडीची बैठक घेतली होती. ‘राजरोसपणे अनधिकृत बांधकामे सुरू आहेत, आपण बघ्याची भूमिका घेऊन चालणार नाही. अनधिकृत बांधकामे सुरूच राहिली तर तुम्ही सगळे अडचणीत याल हे लक्षात ठेवा,’ हा इशाराही आयुक्तांनी दिला. त्यामुळे अनधिकृत बांधकामांच्या सर्वाधिक तक्रारी असलेल्या दिव्यात ११ सप्टेंबरपासून प्रशासनाने या बांधकामांवर कारवाई करण्यास सुरवात केली. दिवा प्रभाग समितीचे सहायक आयुक्त अक्षय गुडधे यांनी पोलिस बंदोबस्तात म्हसोबा नगरच्या चाळी मधील चार खोल्या आणि एका इमारतीची प्लिंथ तोडली. दिवा पूर्व येथील अंगल शाळेसमोर नवीन इमारतीची प्लिंथ सर्व कॉलम तोडले. तसेच दिवा पूर्व येथील नारायण भगत नगर, दिवा रेल्वे स्थानक फलाट क्रमांक आठ जवळ रस्त्यालगत सुरू असलेल्या बेकायदा इमारतीचे बांधकामही दोन जेसीबीच्या सहाय्याने तोडण्यात आले.

दिवा प्रभाग समितीच्या अतिक्रमण विभागाने ऐन गणेशोत्सवातही अनधिकृत बांधकामावर कारवाई केली. साबे-गाव येथील जीवदानी नगर भागातील प्रियदर्शनी अपार्टमेंट जवळ दोन बांधकामे तर दळवी नगर, श्लोक नगर रस्ता, प्रेम विराज अपार्टमेंट मागे अनधिकृत जोत्यावरील बांधकाम तोडण्यात आल्याने भूमाफियांचे धाबे दणाणले आहेत.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page