जनशक्तीचा दबाव न्यूज | संगमेश्वर | सप्टेंबर ११, २०२३.
कोंडिवरे तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी उपसरपंच, पत्रकार जाकीर शेकासन यांची बिनविरोध निवड करण्यात आली. चौदाव्यांदा जाकीर शेकासन यांची फेर निवड करण्यात आली.
कोंडिवरे ग्रामपंचायतीची सर्वसाधारण ग्रामसभा नुकतीच संपन्न झाली. यावेळी सरपंच सायली केंबळे, उपसरपंच जाकीर शेकासन, ग्रा. पं. सदस्य संदीप कदम, शहनाज कापडी, फरीदा माद्रे, शबनम कापडी आदी मान्यवर ग्रामस्थ उपस्थित होते.
ग्रामसेवक संदीप शेडगे यांनी सर्वांचे स्वागत केले. मागील सभेचे इतिवृत्त वाचन करून कायम करण्यात आले. यावेळी विविध विकासात्मक कामा संदर्भात चर्चा करण्यात आली. आरोग्य तसेच महाराष्ट्र ग्रामीण योजना, स्ट्रीट लाईट आदिवर चर्चा करण्यात आली.
महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेंतर्गत अस्तित्वात असणाऱ्या तंट्याबरोबर नव्याने निर्माण झालेले तंटे मिटविण्याची जबाबदारीदेखील तंटामुक्त गाव समितीवर आहे. गावात तंटे निर्माण होऊ नयेत म्हणून समिती प्रतिबंधात्मक उपाय करते. पण, तरी काही तंटे निर्माण होतात. त्यांचे निराकरण करण्याची जबाबदारी या समितीवर आहे. या समितीच्या कोंडिवरे अध्यक्षपदी पत्रकार जाकीर शेकासन यांची चौदाव्यांदा निवड करण्यात आली. यापूर्वी कोंडिवरे गावाला शेकासन यांच्या अध्यक्षतेखाली तंटामुक्त पुरस्कार मिळाला. तसेच अनेक तंटे समापोचाराने मिटवण्यात आले.
यावेळी माजी सरपंच कमरुद्दीन सावंत, बशीर खतीब, दिलदार कापडी, मजीद खान, विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन सुलतान कापडी, दीपक कातकर, निलेश भुवड, सिद्दीक कापडी, लियाकत कापडी, सलाम कापडी, मुख्याध्यापक शाहजाद सावंत, सौ. डोंगरे, आशा सेविका मानसी मोभारकर, अंगणवाडी सेविका सोनाली लिंगायत आदी ग्रामस्थ उपस्थित होते. आपल्यावर दाखवलेला विश्वास सार्थ ठरवू असे तंटामुक्त समिती अध्यक्ष जाकीर शेकासन यांनी सांगितले. यावेळी शेकासन यांचे अभिनंदन करण्यात आले. ग्रामसेवक संदीप शेडगे यांनी आभार मानले.