जनशक्तीचा दबाव न्यूज | मंडणगड | फेब्रुवारी १, २०२३.
येथील लोकनेते गोपीनाथ मुंडे महाविद्यालयाची शैक्षणिक सहल प्रतापगड, महाबळेश्वर, सातारा, कोल्हापूर , पन्हाळा, ज्योतिबा याठिकाणी घेण्यात आली सहलीसाठी राज्य परिवहन महामंडळाच्या एका बसचे नियोजन करण्यात आले होते. या सहलीमध्ये ३ प्राध्यापक व ४० विद्यार्थी सहभागी झाले होते. या शैक्षणिक सहलीचा विद्यार्थ्यांनी मनमुराद आनंद लुटला.
या सहलीत विद्यार्थ्यांनी पर्यटनातून नैसर्गिक परिसर, ऐतिहासिक वास्तू, वस्तूसंग्रहालय, दुध डेअरी गोकूळ प्रकल्प महालक्ष्मी मंदिर, पन्हाळा किल्ल्यावरील सर्व ऐतिहासिक ठिकाणे तसेच ज्योतिबा देवस्थान या ठिकाणचा लाभ घेतला. विद्यार्थ्यांनी चार भिंतीच्या बाहेरचे जग पहावे, त्याचा अनुभव घ्यावा याकरिता या सहलीचे आयोजन करण्यात आले होते. या शैक्षणिक सहलीचे नियोजन वाणिज्य विभागामार्फत प्राचार्य डॉ. राहुल जाधव, उपप्राचार्य डॉ. वाल्मिक परहर यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. शामराव वाघमारे, डॉ. महेश कुलकर्णी, डॉ. पुरुषोत्तम पिलगुलवार यांनी केले होते.