हिरानंदानी ग्रुपच्या मुंबईतील कार्यालयांवर ED ची छापेमारी…
मुंबई – फेमा नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) गुरुवारी मुंबईतील हिरानंदानी ग्रुपच्या मुख्य कार्यालयांसह 4 ठिकाणी छापेमारी केली. या छापेमारीत काही महत्त्वाचे दस्तावेज अधिकाऱ्यांच्या हाती लागल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
तपास यंत्रणेला हिरानंदानी ग्रुपने परकीय चलन व्यवस्थापन कायदा 1999 (फेमा) चे उल्लंघन केल्याची नवी माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारावर ईडीने गुरुवारी या समुहाच्या मुंबई स्थित 4 कार्यालयांवर छापेमारी केली. हिरानंदानी ग्रुपची स्थापना 1978 मध्ये झाली होती. मुंबई, बंगळुरू, चेन्नई, हैदराबाद आदी अनेक शहरांत या समूहाचे प्रकल्प सुरू आहेत. निरंजन हिरानंदानी व सुरेंद्र हिरानंदानी यांची ही कंपनी आहे. यापूर्वी 2022 मध्येही या समुहाच्या 24 ठिकाणांवर ईडीने छापेमारी केली होती. आर्थिक अनियमिततेच्या कथित आरोपांवरून ही कारवाई करण्यात आली होती.