दररोज सकाळी अंकुरलेले ‘मूग’ खा, मिळतील हे जबरदस्त फायदे…

Spread the love

▪️अंकुरित मुगामध्ये प्रथिने, जीवनसत्त्वे तसेच खनिजयुक्त पदार्थ मोठ्या प्रमाणात आहे. जे आपल्या शरीरासाठी खूप महत्वाचे आहेत. अंकुरलेल्या मूगामध्ये डायटरी फायबर्स, व्हिटॅमिन बी -6, लोह, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन-ई, पोटॅशियम, अँटी-ऑक्सिडंट्स, फॉलिक असिड , झिंक इ. असतात ज्यामुळे रोग प्रतिकारशक्ती वाढते.

▪️हे सर्व आपल्याला रोगांविरूद्ध लढण्याची शक्ती देतात. अंकुरलेले मूग खाल्ल्याने शरीराला भरपूर फायबर आणि प्रथिने मिळतात.चला तर जाणुन घेउयात अंकुरित मूग खाण्याचे अधिक फायदे. अंकुरित मुगामध्ये ग्लूकोजची पातळी कमी असते, म्हणूनच ज्यांना मधुमेहाचा त्रास आहे ते सुद्धा अंकुरित मुग खाऊ शकतात.

▪️सकाळी थोड्याश्या अंकुरित मुगाचे सेवन केल्याने शरीरातील कॉलेस्ट्रॉलची पातळी आणि रक्तदाब नियंत्रण राहण्यास मदत होते. अंकुरित मुगाचे सेवन केल्याने चयापचय दर चांगला राहतो आणि शरीराला चांगली ऊर्जा मिळते.

▪️आपल्याला बद्धकोष्ठतेची समस्या असल्यास अंकुरित मुग खा. त्यात भरपूर फायबर आहे. जे पोटाच्या प्रत्येक समस्येपासून आपले संरक्षण करते. तसेच पचनशक्ती सुधारण्यास मदत होते. अंकुरित मुगामध्ये लोहाचे चांगले प्रमाण असते. याच्या सेवनाने हिमग्लोबीनची पातळी सुधारण्यास मदत मिळते.

▪️मोड आलेल्या मुगामध्ये असलेले अँटी-इंफ्लेमेट्री गुण असल्याने संधिवातात (अर्थारायटिस) उपयुक्त ठरतात. आपल्या शरीरात व्हिटॅमिन आणि प्रथिनेची कमतरता असल्यास आपण त्याची कमतरता दूर करण्यासाठी अंकुरित मूग खा.

▪️अपचनाचा त्रास होत असेल तर आपण सकाळच्या नाश्त्यामध्ये एक वाटी अंकुरलेल्या मुगाचा समावेश करा. मुगामध्ये असलेल्या फायबर मुळे आपली पचन शक्ती सुधारण्यास मदत मिळेल.

▪️अंकुरलेल्या मूगाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यात भरपूर एंजाइम असतात, जे पचन सुलभ करण्यास मदत करतात. आपल्याला हे सेवन करून बद्धकोष्ठता येत नाही. तसेच, पोटाशी संबंधित सर्व रोग गायब होतात.

▪️अंकुरित मुगामध्ये व्हिटामिन ए असते. याच्या सेवनाने नजर तीक्ष्ण होते. अंकुरलेल्या मूगामध्ये असलेले गुणधर्म मुरुम काढून टाकण्यास मदत करतात. तुमच्या चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होण्यास मदत मिळते.

▪️जर आपण वजन कमी करण्याबद्दल विचार करत असाल तर अंकुरलेल्या मूगाचे सेवन सुरू करा. आपल्याला लवकरच एक फरक दिसेल. त्यातील फायबर वजन कमी करण्यास मदत करते.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page