जळगांव – चोपडा तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पूर्व हंगामी कापसाचे लागवड केली जाते. तालुक्यात आतापर्यंत ४५% च्या वर कापसाचे लागवड झालेली आहे, कापूसचे रोपटी शेतात डोलू लागली आहेत. परंतु पाऊस लांबल्याने जमिनीतील पाण्याची पातळी खोल जात आहे. त्याचबरोबर विज वेळी अवेळी मिळत असल्याने ठिबकच्या साह्याने पाणी देखील देता येत नाही. त्यामुळे शेतात कापूस हा जळू लागलेला आहे जर पाऊस आला नाही तर, शेतकऱ्यांवर दुबार पेरणी करण्याची वेळ येऊ शकते त्यामुळे शेतकरी हा संकटात सापडलेला आहे.
कापूस उत्पादक शेतकरी यांनी महाग बियाणे घेऊन पूर्व हंगामी कापूस लागवड केलेली आहे. परंतु पाऊस नसल्याने नियमित वीज नसल्याने कापसाला पाणी वेळेवर देता येत नाही. त्यामुळे डोळ्यासमोर कापूस शेतात डोलताना दिसत आहे परंतु पाण्या अभावी समोर शेतात कापूस जळताना पाहावा लागत आहे. जर पाऊस लवकर आला नाही तर कापसाचे परिस्थिती बिकट होईल विजेची पुरवठा वेळेवर आणि कमीत कमी पाच तास नियमित दिला तर ठिबकच्या सहाय्याने कापूस जगू शकतो. परंतु तो देखील वेळेत मिळत नसल्याने शेतकरी राजा हा दुहेरी संकटात सापडलेला आहे. त्याच्यावर दुबार पेरणीची वेळ येईल का त्यामुळे तो खत फवारणी हे देखील घेताना विचार करत आहे.