जनशक्तीचा दबाव न्यूज | दापोली | जानेवारी ३१, २०२३.
ॲड. सुधीर शरद बुटाला, खेड यांची कन्या व कै. डॉ. प्रशांत किसन मेहता, दापोली यांची स्नुषा सौ. समिक्षा कुणाल मेहता या वैद्यकीय क्षेत्रातील अत्यंत प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या रेडियोलाॅजी या विषयाच्या शेवटच्या वर्षाची परीक्षा उत्तीर्ण झाल्या आहेत.
याबद्दल दापोली मंडणगड दशानेमा हितवर्धक मंडळातर्फे डॉ. सौ. समिक्षा कुणाल मेहता यांना सन्मानित करण्यात आले.
यावेळी श्री. अरुण साबळे, मंडळाचे सचिव श्री. शिरीष मेहता, श्री. प्रसाद मेहता, श्री. सुजय मेहता, श्री. भूपेंद्र तलाठी, श्री. विनोद तलाठी, सौ. अमिता तलाठी व डॉ.कुणाल मेहता हे उपस्थित होते.
सौ. समिक्षा हिचे १२ वी पर्यंत शिक्षण खेड येथे झाले. तर MBBS ही पदवी MUHS, नाशिक येथून प्रथम श्रेणीत पास झाल्या. त्यानंतर मुंबई येथील KEM हॉस्पिटल येथे एक वर्ष काम केले. त्यानंतर दापोली उपजिल्हा रुग्णालयात एक वर्ष काम केले. त्यानंतर रेडियोलाॅजी या विषयात पदव्युत्तर शिक्षणासाठी मिरज येथील प्रतिष्ठित अशा वॉनलेस हॉस्पिटल येथे ॲडमिशन मिळाली.
सौ. समिक्षा हिच्या यशाबद्दल सर्व स्तरातून तिचे कौतुक होत आहे. अनेक मान्यवरांनी त्यांना प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा दिल्या.