
संपादकीय : वै वीरकर आज सकाळी खोपोली येथून येणारी ६:२५ ची लोकल प्लेटफॉर्म नंबर ४ वर न येता २ वर आली असता. गर्दीचे प्रमाण जास्त झाल्याने रेल्वे प्रवाशी आक्रमक झाले. आणि दिपिका भगवान शिंदे या महिलेने थेट MOTOR MANच्या कॅबिन मध्ये थान मांडली. त्याठिकाणी रेल्वे पोलीस अधिकारी यांनी मध्यस्थी केल्याने. सादर प्रवाश्यांना समजून सांगून ट्रेन सोडण्यात आली. जवळपास १५ मिनिटे रेल्वे थांबल्याने रेल्वे पोलिसांनी सदर महिलांना ताब्यात घेतल्याचे समजले. रेल्वे प्रवासी संघटनेचे पदाधिकारी, मनसेचे पदाधिकारी रेल्वे पोलीस ठाणे दिवा येथे उपस्थित होवून सहकार्य करत होते.तसेच समाजसेवक अमोल धनराज केंद्रे यांनीही वेळोवेळी पोलिस अधिकारी गिरीश चंद्र तिवारी यांच्याशी संपर्क करून प्रवाशी सामान्य आहेत. त्यांनी जाणून बुजून काहीही केले नाही. त्यांच्यावर कठोर कार्यवाही करण्यात येवू नये अशी विनंती करत होते. प्रत्यक्ष दिवा रेल्वे पोलिस स्टेशन येथे जावून त्या महिलांची भेट घेतली.
त्यानंतर धडाकेबाज युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष अमोल धनराज केंद्रे , ठाणे जिल्हा महिला अध्यक्षा ज्योती निलेश पाटील , राजश्री आयवळे , अनिल मोरया, राहुल शिंदे , केतन जगताप इतर पदाधिकारी यांनी पोलिस अधिकारी गिरीश चंद्र तिवारी साहेबांची भेट घेवून सदर केलेल्या सहकार्य बद्दल आभार मानले. नागरिकांनाही विनंती आहे. कोणीही रेल्वे रोको करू नका आज त्या ताईंना जरी सोडले तरी देखील त्यांच्यावर भारतीय रेल्वे कलम १४३,१४६,१४७,१७४ अंतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे.

जेणेकरून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन आयुष्य भर कोर्ट कचेरी करावी लागेल. असे मत समाज सेवक अमोल केंद्रे यांनी दाबवच्या माध्यमातून व्यक्त केले
( महाराष्ट्राचे मुख्यमंत्री साहेब, उपमुख्यमंत्री साहेब, रेल्वे राज्य मंत्री साहेब, रेल्वे प्रशासन ) सर्वांना विनंती आहे की लाखो दिवा शहरातील नागरिकांची अनेक वर्षांपासून असलेली मागणी “दिवा” ते “छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस” स्पेशल लोकल चालू करून दिवा शहरातील सामान्य जनतेला न्याय द्यावा. अशी विनंती समाज सेवक अमोल केंद्रे यांनी केली.
जाहिरात






