31 मार्चची डेडलाइन अजिबात विसरू नका, Tax वाचवण्याची शेवटची संधी, नंतर येईल…

Spread the love

31 March 2024 Deadline: 1 एप्रिलपासून नवीन आर्थिक वर्षाची सुरुवात होते. 31 मार्च रोजी आर्थिक वर्ष 2023-24 संपणार आहे. 31 मार्च रोजी ना फक्त आर्थिक वर्ष संपतंय तर ही तारीखेला अन्य महत्त्वाच्या कामासाठीची डेडलाइन असणार आहे. गुंतवणुक, टॅक्स फायलिंग, टॅक्स सेव्हिंगसारख्या अन्य आर्थिक काम करायची असल्यास ती आधीच करुन घ्या कारण या कामांची डेडलाइनदेखील 31 मार्च असणार आहे. त्यामुळं आधीच काही नुकसान होण्यापूर्वी व डेडलाइन संपण्याआधी ही कामे पूर्ण करुन घ्या.

31 मार्च रोजी असेसमेंट वर्ष 2021-22 साठी अपडेटेड इनकम टॅक्स रिटर्न फाइल करण्याची शेवटची तारीख आहे. ज्या करदात्यांनी आर्थिक वर्ष 2020-21 साठी रिटर्न फाइल केली नाहीये ते 31 मार्च 2024पर्यंत त्यांचे रिटर्न फाइल करु शकतात. तसंच, ज्या करदात्यांनी 2019-20 या आर्थिक वर्षासाठी त्यांच्या उत्पन्नाचा तपशील दिलेला नाही किंवा चुकीचा दिला आहे. ते 31 मार्च 2024 पर्यंत अर्ज करू शकतात.

कर वाचवण्याची शेवटची संधी..


तुम्ही जर जुनी कर प्रणाली निवडली असेल तर तुमच्याकडे कर वाचवण्याची ही शेवटची संधी आहे. आर्थिक वर्ष 2023-24 साठी कर सवलत मिळवण्यासाठी तुमच्याकडे बचत योजनेत गुंतवणूक करण्यासाठी 31 मार्चपर्यंतच वेळ आहे.तुम्ही ३१ मार्च २०२४ पर्यंत बचत योजनेत गुंतवणूक करून कर सूट मिळवू शकता. तुम्ही पीपीएफ, एपीएस, इक्विटी-लिंक्ड सेव्हिंग स्कीम (ईएलएसएस) आणि एफडी सारख्या योजनांमध्ये गुंतवणूक करून कर वाचवू शकता. 80C व्यतिरिक्त, तुम्ही आयकराच्या कलम 80D, 80G आणि 80CCD(1B) अंतर्गत कर सूट मिळविण्यासाठी वेगवेगळ्या योजनांमध्ये गुंतवणूक करू शकता.

तुम्ही पीपीएफ किंवा सुकन्या समृद्धी योजनेसारख्या छोट्या बचत योजनांमध्ये गुंतवणूक केली असेल, तर या सरकारी अल्पबचत योजनांमध्ये किमान गुंतवणूक ठेवणे आवश्यक आहे. तुमच्या बचत योजनेत किमान गुंतवणुकीसाठी तुम्हाला मिनिमम डिपॉजिट भरावे लागेल. जर तुम्ही मिनिमम डिपॉझिट ठेवले नाही तर तुमचे खाते डीफॉल्ट होईल. खाते पुन्हा सुरू करण्यासाठी तुम्हाला दंड भरावा लागेल.अशा परिस्थितीत, जर तुम्ही या बचत योजनांमध्ये गुंतवणूक केली असेल, तर त्यामध्ये 31 मार्चपर्यंत किमान रक्कम गुंतवा.

जर तुमच्या कारमध्ये फास्टॅग असेल तर 31 मार्चपूर्वी त्याचे केवायसी करुन घ्या. केवायसीशिवाय फास्टॅग 31 मार्चनंतर सुरू होण्यास अडचण येऊ शकते. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने FASTag KYC तपशील अपडेट करणे अनिवार्य केले आहे. त्याची अंतिम मुदत 29 फेब्रुवारी ते 31 मार्च 2024 पर्यंत वाढवण्यात आली आहे. ३१ मार्चपर्यंत तुमचा फास्टॅग केवायसी न केल्यास तुमचा फास्टॅग निष्क्रिय होऊ शकतो.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page