शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यासाठी असा करा हळदीचा वापर, आतड्या होतील साफ…..

Spread the love

सध्या उत्सवाचं वातावरण सुरू आहे अशात तुम्ही मिठाई, चटपटीत आणि तेलकट पदार्थांच खूप सेवन करत असाल. असे पदार्थ जास्त खाल्ल्याने तुमच्या शरीरात अनेक विषारी पदार्थ जमा होऊ शकतात. यामुळे पोट, लिव्हर, आतड्या आणि किडन्यांमध्ये विषारी पदार्थ जमा होतात. जे वेळीच शरीरातून काढणं गरजेचं असतं.

शरीराचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी आणि चांगलं कामकाज होण्यासाठी याची सफाई करणं म्हणजे शरीर डिटॉक्सीफाय करणं गरजेचं आहे. शरीरात जमा झालेले विषारी पदार्थ बाहेर काढण्यासाठी तुम्ही हळदीचा वापर करू शकता.

एक्सपर्टनुसार, हळद आपल्या अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट आणि अ‍ॅंटी-इंफ्लामेटरी गुणांमुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यात मदत करते. चला जाणून घेऊ तुम्ही याचा वापर कसा करू शकता.

▪️हळदीचं दूध…

हळदीचं दूध केवळ शरीराला पोषक तत्व देण्यासाठीच नाही तर शरीर डिटॉक्सीफाय करण्यासाठीही फार चांगली आहे. हे तयार करण्यासाठी दूध हळद आणि काळ्या मिऱ्यांसोबत उकडा. ज्यामुळे याची ताकद वाढते. यानंतर यात मध मिक्स करणं विसरू नका.

▪️डिटॉक्स वॉटर…

हे सोपं करण्यासाठी यात हळदीसोबत आल्याचा वापर करा. एक मोठं काचेचं भांड घ्या आणि त्यात कोमट पाणी टाका. यात रात्रभर दालचिनीचा एक तुकडा, आल्याचा एक तुकडा, लिंबाचा तुकडा आणि पुदीन्याची पाने टाका. सकाळी हे पाणी चिमुटभर हळद टाकून उकडा. त्यानंतर हे पाणी तुम्ही दिवसभर थोडं थोडं पित रहा. याने पोट फुगणं, सूज, घशातील खवखव, फ्लू आणि अ‍ॅलर्जीसारख्या समस्या दूर होतात.

▪️हळदीचा चहा…

हा चहा तयार करण्यासाठी 1 चमचा ताजी हळद, अर्धा चमचा बारीक केलेलं आलं, 1 चमचा मध, अर्धा चमचा लिंबाचा रस, 2 कप गरम पाणी घ्या. पाणी उकडा आणि त्यात आलं व हळद टाका. हे मिश्रण उकडून घ्या आणि चहा गाळून घ्या. यात लिंबाचा रस, मध मिक्स करा. हा चहा प्यायल्याने सूज, अस्वस्थता, शरीरावरील सूज कमी करण्यास व वेदना कमी करण्यास मदत मिळते.

▪️हळदीचे गुण आणि फायदे…

हळदीमध्ये असलेलं तत्व करक्यूमिन खूप फायदेशीर असतं. करक्यूमिनमध्ये अ‍ॅंटी इंफ्लामेटरी, अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट आणि अ‍ॅंटी-कॅन्सर गुण असतात. हळदीमध्ये करक्यूमिनशिवाय अनेक पोषक तत्वही असतात. तसेच यात व्हिटॅमिन सी, मिनरल्स, फायबर आणि प्रोटीन भरपूर असतं.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page