ठाणे: टोल नाक्यां विरोधात मनसेकडून करण्यात आलेलं आंदोलन सर्वश्रूत आहे. काही वर्षांपूर्वी मनसेकडून टोल नाक्यां विरोधात खळ-खट्याक आंदोलन करण्यात आलं होतं. त्यानंतर राज्यातील अनेक टोल नाके बंद झाली होती. विशेष म्हणजे मनसेकडून आता देखील मुंबई-गोवा महामार्गावर आक्रमकपणे आंदोलन केली जात आहे. मनसे कार्यकर्त्यांनी गेल्या आठवड्यात काही टोल नाक्यांवर तोडफोड केल्याची बातमी समोर आली होती. मुंबई-गोवा महामार्गाचे काम लवकरात लवकर व्हावं आणि चांगल्या दर्जाचं व्हावं, या मागणीसाठी मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. त्यानंतर आता एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे.
मुंबई-नाशिक महामार्गावर मुलुंडच्या पुढे नाशिकच्या दिशेला प्रचंड वाहतूक कोंडी समस्या उद्भवते. ही वाहतूक कोंडी दोन्ही बाजूने असते. गेल्या अनेक दिवसा पासूनची ही गंभीर समस्या आहे. त्यावर मार्ग काढण्यासाठी आता वाहतूक विभाग पुढे सरlआहे. वाहतूक विभागाकडून जड, अवजड वाहनांसाठी काही नियम जारी करण्यात आले आहेत. तसेच मुलुंड टोल नाक्याला देखील महत्त्वाचा निर्देश जारी करण्यात आला आहे.
ठाणे वाहतूक विभागाचे जड, अवजड वाहन चालकांना आणि टोल नाक्यांना महत्त्वाचं आवाहन केलं आहे. दिलेल्या वेळेच्या अभावी जड, अवजड वाहने शहरात आढळली तर कारवाईचा बडगा उगारला जाईल, असा मोठा इशारा वाहतूक विभागाने दिला आहे. तसेच मुलुंड टोल प्लाझाला महत्त्वाचा निर्देश देण्यात आला आहे. कोणतीही गाडी बंद पडल्यास टोल न आकारता सरसकट गाड्या सोडण्यात याव्या, अशी सूचना ठाणे वाहतूक विभाग पोलीस उपायुक्त डॉक्टर विनय कुमार राठोड यांनी दिली आहे.
जाहिरात
जाहिरात