हिंदू धर्मात, सूर्यग्रहणाच्या वेळी लोकांना काही गोष्टी करण्यास मनाई आहे. ग्रहणाच्या काळात या गोष्टी केल्याने लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते आणि आयुष्यात संकटं येतात असे मानले जाते. सूर्यग्रहण काळात कोणती कामे करू नयेत, हे जाणून घेऊया.
2024 सालचं पहिलं सूर्यग्रहण हे 8 एप्रिल रोजी लागणार आहे. 8 एप्रिलला चैत्र महिन्यातील अमावस्येच्या दिवशी संपूर्ण सूर्यग्रहण होईल. हे सूर्यग्रहण अत्यंत खास असून तब्बल 50 वर्षांनंतर हे सूर्यग्रहण होत आहे. सूर्यग्रहणाच्या 12 तास आधी सुतक कालावधी सुरू होणार आहे. सूर्यग्रहण काळात लोकांनी अनेक गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे. विशेषत: गर्भवती महिलांनी काही गोष्टी चुकूनही करू नयेत. तसेच ग्रहणकाळात येणाऱ्या सुतक काळाकडेही विशेष लक्ष द्यावे लागते.
या वर्षातील पहिलं सूर्यग्रहण हे 8 एप्रिल रोजी रात्री 9:12 वाजता सुरू होईल आणि 9 एप्रिल रोजी दुपारी 2:22 वाजता संपेल. धार्मिक मान्यतेनुसार, ग्रहणाचा सुतक कालावधी 12 तास किंवा 9 तास आधी सुरू होतो, ज्यामध्ये सूर्यग्रहणाचा सुतक कालावधी ग्रहणाच्या वेळेच्या 12 तास आधी सुरू होतो. सुतक काळ हा एक प्रकारे अशुभ काळ मानला जातो. त्यामुळे सुतक काळात कोणतेही शुभ किंवा मंगल कार्य केले जात नाही.
🔹️कुठे कुठे दिसणार वर्षातलं पहिलं सूर्यग्रहण ?
2024 या वर्षातील पहिलं सूर्यग्रहण हे कॅनडा, मेक्सिको, युनायटेड स्टेट्स, अरुबा, बर्म्युडा, कॅरिबियन नेदरलँड, कोलंबिया, कोस्टा रिका, क्युबा, डोमिनिका, ग्रीनलँड, आयर्लंड, आइसलँड, जमैका, नॉर्वे, पनामा, निकाराग्वा, रशिया, पोर्तो रिको, सेंट मार्टिन, स्पेन, बहामास, युनायटेड किंगडम आणि व्हेनेझुएलासह जगाच्या काही भागांमध्ये दृश्यमान असेल.
🔹️ग्रहणाच्या काळात ही कामं करू नका
▪️सूर्यग्रहणाच्या वेळी लोकांनी घराबाहेर पडू नये तसेच ग्रहणाकडे थेट डोळ्यांनी पाहू नये.
▪️ग्रहणाच्या काळात स्वयंपाकघरातील कोणतीही कामं करू नयेत. विशेषतः अन्न शिजवू नये.
▪️ग्रहणकाळात गरोदर महिलांनी घराबाहेर अजिबात जाऊ नये. तसेच सुईत दोराही ओवू नये.
▪️सूर्यग्रहण काळात काहीही चिरू नका, सोलू नका.
▪️ग्रहणकाळात कोणाला दुखवू नका किंवा गरीब व्यक्तीला त्रास देऊ नका किंवा कोणाचाही अपमान करू नका.
▪️ग्रहणकाळात घरात कोणाशीही वाद घालू नका, कारण ग्रहणकाळात वादविवाद केल्याने पितरांचा आशीर्वाद मिळत नाही.
▪️ग्रहण काळात देवघरात ठेवलेल्या मूर्तींना हात लावू नका किंवा पूजा करू नका.
▪️ ग्रहणाच्या वेळी सूर्यदेवाचे ध्यान करताना त्यांच्या मंत्रांचा उच्च स्वरात जप करावा. हा मंत्र पुढीलप्रमाणे आहे – ‘ॐ ह्रां ह्रीं ह्रौं स: सूर्याय नम:’।
🔹️सुतक काळ
हिंदू धर्मात ग्रहणाचा सुतक काळ हा अशुभ किंवा दूषित काळ मानला जातो. सुतक काळात देवाची पूजा केली जात नाही. तसेच कोणतेही मंगळ अथवा शुभ कार्य केले जात नाही. याशिवाय मंदिरांचे दरवाजेही बंद असतात. एवढेच नाही तर सुतक काळात खाणे, पिणेही निषिद्ध मानले जाते. सुतक कालावधी सूर्यग्रहणाच्या १२ तास आधी सुरू होतो आणि ग्रहण संपल्यानंतर सुतक कालावधीही संपतो.