
देवरुख | नोव्हेंबर ०६, २०२३.
▪️देवरुख नगर पंचायतीचे माजी उपनगराध्यक्ष, रत्नागिरी (द.) जिल्हा ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष, भाजपा नेते श्री. अभिजीत शेट्ये यांच्या संकल्पनेतून ‘भाजपा घराघरात’ पोचण्यासाठी दिवाळीच्या पवित्र पर्वाचे औचित्य साधून देवरुखवासियांसाठी ‘अभिष्टचिंतन भेट’ देण्याचा उपक्रम भारतीय जनता पार्टी, देवरुखने हाती घेतला आहे. देवरुख शहरातील सुमारे ४००० घरांमध्ये दीपावली भेटवस्तू पोचवण्याचा संकल्प करून भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते एक सामाजिक आदर्श प्रस्थापित करणार आहेत.
▪️श्री. अभिजीत शेट्ये कुशल संघटक आणि प्रभावी वक्ते आणि तळागाळापर्यंत पोचणारे कार्यकर्ते आहेत. नगरसेवक, उपनगराध्यक्ष म्हणून जबाबदारीच्या काळात विविध सामाजिक उपक्रम राबवून त्यांनी आपल्या कार्याची छाप देवरुखच्या नागरिकांवर पाडली होती. आता सामाजिक भावनेने ते लोकांची दिवाळी गोड होण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
▪️आपल्या मनोगतात ते म्हणाले, “ज्या लोकांनी आम्हाला त्यांचा प्रतिनिधी म्हणून काम करण्याची संधी दिली त्यांच्या आनंदात वाटेकरी होण्याची संधी प्रतिवर्षी दिवाळीला मिळते. दरवर्षी लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही हा अनुभव घेतो. मात्र यावेळी तसे नाही; तरीही मा. उपमुख्यमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे जनसेवा ‘हीच ईश्वर सेवा’ ही भावना मनात ठेवून आम्ही सर्व भाजपा कार्यकर्ते जनता-जनार्दनास ‘दिवाळी अभिष्टचिंतन भेट’ घरोघरी जाऊन देणार आहोत. शासनाच्या माध्यमातून’आनंदाचा शिधा’ मिळतो आहेच. याला जोड म्हणून आम्हा कार्यकर्त्यांकडून यथाशक्ती विनम्र भेट.”
▪️यावेळी भाजपा नेते, संगमेश्वर-चिपळूण विधानसभा निवडणूक प्रमुख श्री. प्रमोद अधटराव, संगमेश्वर (द.) तालुकाध्यक्ष श्री. रूपेश कदम, संगमेश्वर (उ.) तालुकाध्यक्ष श्री. विनोद म्हस्के, महिला मोर्चा तालुकाध्यक्षा सौ. स्नेहा फाटक, सरचिटणीस श्री. रुपेश भागवत, श्री. यशवंत गोपाळ, श्री. मिथुन निकम, श्री. प्रथमेश धामणस्कर, श्री. महेंद्र आंबेकर, श्री. सुधीर यशवंतराव, श्री. श्रीकांत भागवत, श्री. सुशांत मुळ्ये, श्री. दत्ता नार्वेकर, श्री. संजय भागवत, श्री. प्रभंजन केळकर, श्री. राहुल फाटक, श्री. संदीप बने, श्री. संदीप वेलवणकर, श्री. अमोल गायकर, श्री. वैभव कदम, श्री. सुनील गोपाळ, श्री. प्रमोद शिंदे, श्री. महेश धामणस्कर, श्री. अक्षय शिंदे, श्री. शुभम पांचाळ तसेच ग्रामपंचायत तळेकांटेच्या सार्वत्रिक निवडणुकीत रोमहर्षक लढतीत विजयी झालेल्या नवनिर्वाचित सरपंच सौ. सुषमा बने, तसेच अन्य भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.