
*दिवा (प्रतिनिधी )-* दिवा ग्लोबल हायस्कूल ते जिव्हाळा हालपर्यंत असलेला टाटा पाँवर रोड म्हणून ओळखला जाणाऱ्या रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य वाहन चालकांसाठी डोकेदुखी ठरत आहे.गेल्या अनेक वर्षापासून सुरु असलेल्या रस्त्याचे बांधकाम न झाल्यामुळे नागरिकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे.रस्त्यातील खड्डे,चिखलाच्या साम्राज्यामुळे अपघाताच्या संख्येत वाढ झाली आहे.
विद्यमान सरकारकडून सध्या शहरी रस्त्यांना मुख्य रस्त्यांशी जोडण्याचे काम जोरात सुरु आहे.रस्त्यांअभावी नागरिकांची होणारी गैरसोय टाळावी हा यामागील उद्देश आहे.मात्र ठाणे महानगरपालिकेच्या उदासिन कारभारामुळे टाटा पाँवर रस्ता म्हणजे या मार्गावरील वाहनचालकांसाठी चांगलाच डोकेदुखीचा ठरला आहे.रस्ता चांगला नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे.त्यामुळे चिखलात रस्ता की रस्त्यात चिखल हे कळण्यास मार्ग नाही.

हा रस्ता दिव्यातील स्टेशनरोडला जोडलेला आणि दातिवली,गणेशनगर,डोंबिवली,आगासन,बेडेकरनगर आदी नागरिकांना अडचणींच्या काळात प्रवास करण्यास महत्वाचा ठरत असतो.दिवा चौकातील गर्दीप्रसंगी या मार्गावरुन अनेक वाहने सहज प्रवास करु शकतात.हा रस्ता व्हावा यासाठी शिवसेना उद्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे बी.आर.नगर येथील उपशाखाप्रमुख श्री विलास उतेकर यांनी ठाणे महानगरपालिकेच्या दिवा प्रभाग समितीला निवेदन सादर केले होते.परंतु या निवदेनाकडे वारंवार कानाडोळा करण्यात आला.त्यामुळे या रस्त्याचे काम अनेक वर्षे रखडलेले आहे.
अपघात झाल्यास पालिका जबाबदार – विलास उत्तेकर
*टाटा पाँवर लाईनचा रस्ता व्हावा या बाबत आम्ही पालिकेला निवेदन दिलेले आहे.हा रस्ता अनेक वर्षापासून रखडलेला आहे.पावसाळ्यात या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल पसरतो.तसेच मोठे खड्डेही पडतात.रस्त्यात पावसाच्या पाण्यामुळे डबके तयार झाल्यामुळे चालकांना संकटांना सामोरे जावे लागत आहे.पालिकेने रस्ता न सुधारल्यास होणाऱ्या अपघातांना ठाणे महानगरपालिका स्वत जबाबदार राहील.*
-श्री विलास उत्तेकर,उपशाखाप्रमुख,उद्धव बाळासाहेब ठाकरे गट


