
ठाणे : निलेश घाग दिव्यात कोटीच्या कोटी रुपये निधी येतोय आणि त्यातून विकास होतोय असं दाखवलं जातंय पण प्रत्यक्षात फक्त कंत्राटदार आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांचे खिसे भरले जातायत. यासाठी दिवा-शीळ रस्त्याचे काम हे जिवंत उदाहरण आहे.
दिवा शीळ रस्त्याच्या ४.५ किमी च्या कामासाठी २०१९ मध्ये १६.८८ कोटी रुपयांची कामाची ऑर्डर महापालिकेकडून काढण्यात आली.
शिळफाटा ते दिवा चौक पर्यंत एकूण २४ मीटरच्या रस्त्याचे काम त्यात देण्यात आले होते. सदर रस्त्याचे काम हे २ वर्षात पूर्ण करायचे होते. ज्याला २ वर्षाची मुदतवाढ देण्यात आली. पण ४ वर्षे उलटूनही अजून रस्त्याचे काम ५०% सुद्धा पूर्ण झालेलं नाही.

विकासाच्या नावावर कंत्राटदार आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांचे खिसे भरले जात आहेत ;- तुषार पाटील मनसे शहर अध्यक्ष दिवा

जून २०२२ मध्ये विशेष निधी म्हणून ७२ कोटी रुपये देण्यात आले. त्यातले अंदाजे २० कोटी रुपये याच दिवा-शीळ रस्त्यासाठी पुन्हा देण्यात आले.
म्हणजे ४.५ किलोमीटरच्या रस्त्यासाठी साधारण ३७ कोटी रुपये देण्यात आले. याचाच अर्थ प्रत्येक एककिलोमीटर साठी अंदाजे ८ कोटी ३३ लाख रुपये खर्च होतोय.
महत्वाचं म्हणजे आधी १६.८८ कोटीचं कंत्राट हे बिटकॉन कंपनीला देण्यात आले होते आणि आता विशेष निधीमध्ये देण्यात आलेले अंदाजे २० कोटींचे काम हे ए आय एस इन्फ्रास्ट्रक्चर यांच्या कडे देण्यात आले आहे. एकाच रस्त्याच्या कामासाठी दोन वेगवेगळ्या कंत्राटदारांना काम देण्यात आले आहे हे कसं ?
दोन्ही कामांना दिलेली मुदत ही आधीच संपलेली आहे. मग आता सुरू असलेले काम नक्की कोणत्या कंत्राटदाराकडून सुरू आहे ?
दिवा तुषार पाटील मनसेचे शिष्टमंडळ पुढच्या आठवड्यात ठाणे महापालिका आयुक्तांची भेट घेऊन संपूर्ण पुरावे आयुक्तांसामोर मांडून दिवा शीळ रस्त्याच्या कामाच्या चौकशीची मागणी करणार आहे.
जाहिरात



जाहिरात
