
वसई: वसई विरार महानगरपालिकेत ठेकेदारांनी केलेल्या १२२ कोटीच्या गैरव्यवहार प्रकरणाची चौकशी मागील ५ वर्षांपासून रखडली आहे. याप्रकरणी विशेष तपास पथकामार्फत तपास करण्याचे तत्कालीन मुख्यमंत्र्यांचे आश्वासन देखील पोकळ ठरले आहे. नुकत्याच झालेल्या हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याप्रकरणी लवकर अंतिम अहवाल सादर करण्याचे आश्वासन दिले आहे.

वसई विरार महानगरपालिकेत ठेकेदारांनी सुमारे १२२ कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचे प्रकऱण २०१८ मध्ये उघडकीस आले होते. २०१२ ते २०१८ या ६ वर्षाच्या कालावधीत कंत्राटी कर्मचारी पुरविण्याचा ठेका घेतलेल्या २५ ठेकेदारांनी सुमारे १२२ कोटी रुपयांचा गैरव्यवहार केला होता. या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला होता, मात्र त्यांनी आरोपींच्या फायद्यासाठी तपास लांबवून अनेक त्रुटी ठेवल्या होत्या. ठेकेदारांना फरार दाखवून अटक टाळली होती. या प्रकरणाची कोकण विभागीय कोकण आयुक्त (कोकण विभाग) यांच्यामार्फत सुरू असलेली चौकशी अद्याप पूर्ण झालेली नाही. ५ वर्षांपासून ही चौकशी रखडली आहे. यामुळे ठेकेदारा मोकाट असून त्यांच्यावर काहीच कारवाई झालेली नाही. हे ठेकेदार पुन्हा पालिकेत सक्रीय झाले आहेत तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विरार येथे जाहीर सभा झाली होती. यावेळी मुख्यमंत्र्यांनी वसई विरार महापालिकेतील घोटाळ्याची विशेष तपास पथक स्थापन करून चौकशी केली जाईल, असे जाहीर केले होते. मुख्यमंत्र्यांनी सुचना देताच पोलीस सक्रिय झाले आणि ठेकेदार घोटाळ्या प्रकरणी आकाश एंटरप्राइजच्या विलास चव्हाण या ठेकेदाराला अटक केली. आम्ही या प्रकरणात पहिली अटक केली असून इतर आरोपींना लवकरच अटक केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले होते. मात्र ना विशेष तपास पथकाची (एस.आय.टी) स्थापना झाली ना इतर आरोपी ठेकेदारंना अटक झाली, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकत्याच पार पडलेल्या विधीमंडळाच्या हिवाशी अधिवेशनात दिले होते. त्यामुळे या प्रकरणी काय अहवाल येईल, त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
जाहिरात


