दिव्यात बेशिस्त रिक्षाचालक वाहतूक विभागाच्या रडारवर
दिवा : वार्ताहर दिवा शहरातील वाहतूक कोंडीच्या प्रश्नावर आज मनसेचे दिवा शहर अध्यक्ष तुषार पाटील यांनी वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश खेडेकर यांची भेट घेतली. दिवा -शीळ रस्त्यावरील दिवा चौक प ते दिवा रेल्वे फाटका पर्यंतची संपूर्ण वाहतूक व्यवस्था ही कोलमडलेली आहे. दिवा रेल्वे फाटक परिसर हा बेशिस्त रिक्षाचालकांनी अक्षरशः व्यापून टाकलेला आहे. रेल्वे पादचारी पुलाच्या समोर बेशिस्त पद्धतीने रिक्षा उभ्या केल्या जातात,
यामुळे रेल्वे स्थानकातून नागरिकांना स्थानकातून बाहेर पडणे जिकरीचे होते. रिक्षाचा बॅच नसलेले, बॅच न दाखवणारे, स्टँडच्या बाहेर रिक्षा उभी करणारे, भाडे नाकारणे, जादा भाडे आकारणे तसेच जादा प्रवासी घेऊन प्रवास करणे आणि रिक्षाचालकाचे कपडे न घालणारे अशा १७ हजार ४४२ रिक्षाचालकांवर ठाणे शहरात गेल्या चार महिन्यांत वाहतूक पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. रिक्षाचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असल्याची माहिती ठाणे वाहतूक विभागाकडून देण्यात आली आहे.
ठाणे महापालिका हद्दीतील ठाणे, कळवा, मुंब्रा आणि दिवा शहरात बेशिस्त रिक्षा चालवणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. या रिक्षाचालकांना धडा शिकवण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून दंडात्मक कारवाई मागील जून महिन्यांत एकूण १७ हजार ४४२ रिक्षा चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली होती. असे प्रकार दिवा शहरात सर्रास सुरू आहेत. त्यामुळे अशा रिक्षाचालकांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी दिवा मनसे कडून करण्यात आलेली आहे.
सोबतच दिवा शहरातील वाहतुकीचे योग्य नियमन केले गेल्यास शहरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल असेही मनसेने आपल्या पत्रात म्हटले आहे. यावेळी त्यांच्या सोबत शहर अध्यक्ष तुषार पाटिल,शहर सचिव प्रशांत गावडे, विभाग अध्यक्ष प्रकाश पाटील आणि उपविभाग अध्यक्ष गणेश भोईर उपस्थित होते.
वाहतूक विभाग सतर्क.
ठाणे शहरात रिक्षा चालकांच्या बेशिस्त वर्तनामुळे प्रवाशांना होत असलेल्या त्रासाच्या तक्रारी वाढल्या होत्या. याची दखल घेत या रिक्षा चालकांच्या मुजोरीला चाप बसवण्यासाठी वाहतूक विभाग सतर्क झाला असून अशा रिक्षा चालकांवर कारवाई वाहतूक विभाग करणार ? याकडे प्रवाशांचे लक्ष लागले आहे.
जाहिरात
जाहिरात
जाहिरात