
रत्नागिरी:- राज्याचे उद्योग मंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री उदय सामंत हे रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
▪️बुधवार 18 ऑक्टोबर रोजी पहाटे 3.50 वाजता कोंकणकन्या एक्सप्रेसने चिपळूण येथे आगमन व मोटारीने शासकीय विश्रामगृह, चिपळूण कडे प्रयाण. पहाटे 4.10 वाजता शासकीय विश्रामगृह, चिपळूण येथे आगमन व राखीव.
▪️सकाळी 8 वाजता मुंबई गोवा महामार्गावरील कोसळलेल्या निर्माणधीन पुलाची पाहणी
(स्थळ : बहाद्दुरशेख नाका, चिपळूण)
▪️सकाळी 9 वाजता चिपळूण येथून मोटारीने पाली, ता. जि. रत्नागिरी कडे प्रयाण.
▪️सकाळी 11 वाजता पाली येथे आगमन व राखीव.
▪️सकाळी 11.15 वाजता भेटीसाठी राखीव (स्थळ : पाली, ता. जि. रत्नागिरी). दुपारी 1 वाजता शिवसेना ग्रामीण व शहर पदाधिकाऱ्यांसमवेत बैठक
(स्थळ : पाली, ता.जि. रत्नागिरी)
▪️दुपारी 2 वाजता जे.एस. डब्ल्यू कामगार संदर्भात आढावा बैठक. (स्थळ : पाली, ता. जि. रत्नागिरी) ▪️दुपारी 2.30 वाजता कळझोंडी धरणाची उंची वाढविण्यासंदर्भात बैठक (स्थळ : पाली, ता.जि. रत्नागिरी)
▪️दुपारी 3 वाजता चौगुले पोर्ट संदर्भात बैठक (स्थळ : पाली, ता.जि. रत्नागिरी) ▪️दुपारी 4 वाजता सावंत पॅलेस हॉटेल येथे सदिच्छा भेट (स्थळ : सावंत पॅलेस हॉटेल, टीआरपी, एम.आय.डी.सी., रत्नागिरी).
▪️सायंकाळी 4.30 वाजता संगमेश्वर तालुक्यातील कुंडी व निगुडवाडी या गावातील जमिन खरेदी-विक्री
गैरव्यवहाराबाबत चौकशी संदर्भात स्थापन करण्यात आलेल्या त्रिसदस्यीय समिती समवेत बैठक (स्थळ : जिल्हाधिकारी कार्यालय)
▪️सायंकाळी 5 वाजता रत्नागिरी जिल्ह्यातील विविध लघुपाटबंधारे योजना संदर्भात आढावा बैठक (स्थळ : जिल्हाधिकारी कार्यालय).
▪️सायंकाळी 5.30 वाजता कै. यासिन कोतवडेकर (मामू) यांच्या कुटूंबियांची सांत्वनपर भेट (स्थळ : साखरतर, रत्नागिरी).
▪️सायंकाळी 6.30 वाजता शासकीय विश्रामगृह, रत्नागिरी येथे आगमन व राखीव.
▪️सांयकाळी 7 वा. नंतर नरात्रौत्सवानिमित्त् रत्नागिरी शहरातील विविध नवरात्रौत्सव मंडळांना भेटी व दर्शन.
▪️सोईनुसार शासकीय विश्रामगृह, रत्नागिरी येथे आगमन व राखीव. रात्रौ 10.30 वाजता शासकीय विश्रामगृह, रत्नागिरी येथून मोटारीने रत्नागिरी रेल्वे स्थानकाकडे प्रयाण.
▪️रात्रौ 10.55 वाजता रत्नागिरी रेल्वे स्थानक येथे आगमन व कोंकणकन्या एक्सप्रेसने ने मुंबई कडे प्रयाण.