कंत्राटी व खाजगी नोकरी भरतीचा जीआर काढणाऱ्या विद्यमान महाविकास आघाडीचा रत्नागिरी भारतीय जनता पार्टीच्या वतीने तीव्र निषेध.
जीआर रद्द करणाऱ्या ना. देवेंद्रजी फडणवीस यांचे मानले आभार
रत्नागिरी : कंत्राटी पद्धतीने भरती करण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला होता याचा निषेध करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय समोर जिल्हाध्यक्ष राजेशजी सावंत यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टी रत्नागिरीच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले व भाजपा युवा मोर्चा यांच्या वतीने गोगटे जोगळेकर महाविद्यालय येथे घोषणा देत निषेध आंदोलन करण्यात आले. व प्रतीकात्मक पुतळ्यास जोडे मारून निषेध व्यक्त करण्यात आला.
तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वातील तात्कालीन सरकारने कंत्राटी नोकर भरतीचा काढलेला जीआर ना.देवेंद्रजी फडणवीस यांच्या माध्यमातून रद्द करण्यात आल्याने काँग्रेस, शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस व उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना यांचे पाप मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार महायुतीच्या सरकारने धुतले आहे. बेरोजगार तरुणांना यामुळे मोठा दिलासा महायुती सरकारने दिला आहे. कोरोना काळामध्ये काम केलेल्या बेरोजगारांना कायमस्वरूपी सेवेमध्ये सामावून घ्या अशी देखील मागणी आम्ही देवेंद्रजी फडणवीस आणि महायुती सरकारकडे करणार असल्याचे जिल्हाध्यक्ष राजेशजी सावंत यांनी यावेळी सांगितले.
महिला जिल्हाध्यक्ष सुजाताताई साळवी यांनी आपले मत व्यक्त करताना म्हटले की खोटे बोला पण रेटून बोला, आपले पाप दुसऱ्यांच्या नावाने खपवा ही उद्धव बाळासाहेब ठाकरे सरकारची नीती होती. कंत्राटी भरतीचे पाप हे महाविकास आघाडीचे असून कंत्राटी भर्तीचा निर्णय विद्यमान सरकारने रद्दबातल केला आहे.
त्यामुळे देवेंद्रजी फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आम्ही अभिनंदन करतो.
यावेळी उपस्थित भारतीय जनता पार्टी कार्यकर्ते यांनी महाविकास आघाडीचा निषेध असो आणि महायुती सरकारचा विजय असो, कंत्राटी पद्धतीने भरती करण्याचा निर्णय घेणाऱ्या सरकारचा निषेध अशा घोषणा देण्यात आल्या. काँग्रेस ,शिवसेना (उबाठा) शरद पवार (राष्ट्रवादी) या महाविकास आघाडीचा निषेध करत महाविकास आघाडी सरकारचा प्रतीकात्मक पुतळ्यावर जोडे मारून निषेध व्यक्त करण्यात आला.
यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष राजेशजी सावंत, भाजपा महिला जिल्हाध्यक्ष सुजाताई साळवी युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष डॉ. ऋषिकेश केळकर, सर्व मंडळातील तालुका अध्यक्ष, युवा मोर्चा, महिला मोर्चा, कार्यकर्ते पदाधिकारी, शहराध्यक्ष आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.