रत्नागिरी जिल्हा विज्ञान शिक्षक मंडळातर्फे जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन.

Spread the love

जनशक्तीचा दबाव न्यूज | रत्नागिरी | फेब्रुवारी ०७, २०२३.

२८ फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधून रत्नागिरी जिल्हा विज्ञान शिक्षक मंडळातर्फे जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर निबंध स्पर्धा स्वातंत्र्यसैनिक कै. डी. जी. इनामदार यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित करण्यात येत आहे.

निबंध स्पर्धेविषयीचे सविस्तर निकष पुढीलप्रमाणे आहेत:-

१. निबंध स्पर्धेसाठी “पर्यावरण संरक्षणात माझी भूमिका” हा विषय ठेवण्यात आला आहे.

२. या स्पर्धेत ५वी ते ८वी इयत्तेतील शिकणारे विद्यार्थी-विद्यार्थिनी (प्राथमिक व माध्यमिक शाळा) सहभागी होऊ शकतात.

३. निबंधाचे माध्यम मराठी किंवा इंग्रजी असेल.

४. निबंधासाठी शब्द मर्यादा किमान ५०० शब्द असतील.

५. निबंध स्वहस्ताक्षरात लिहिलेले असावेत, टंकलिखित नसावेत.

६. प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकांना रोख रक्कम सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र दिले जाईल.

७. स्पर्धेसाठी कोणतेही प्रवेश शुल्क नाही.

जास्तीतजास्त स्पर्धकांनी उत्स्फुर्तपणे या निबंध स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

निबंध पाठवण्याची अंतिम तारीख सोमवार दि.२० फेब्रुवारी, २०२३ रोजी संध्याकाळपर्यंत असेल. स्पर्धकांनी आपले निबंध पुढील पत्त्यावर पाठवावेत.

🔸 श्री. सनगरे पी. टी. (कार्यवाह),
रत्नागिरी जिल्हा विज्ञान शिक्षक मंडळ,
मु. पो. ता. लांजा (वैभव वसाहत),
स्वामी स्वरूपानंद नगर, लांजा.
जि. रत्नागिरी.
मोबा. ९४२३०५००२९/ ८२७५९१३९२३

🔸 अधिक माहितीसाठी संपर्क :-

▪️ श्री. रवींद्र इनामदार (अध्यक्ष) – ७५८८५५७५२४
▪️ आर. व्हि. जानकर (स्पर्धाप्रमुख) – ९४२२८१७६२५.

 

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page