दिवा : दिवा रेल्वे स्थानकातून गणेशोत्सवा निमित्त कोकणात जाणारे भाविक रात्रभर रेल्वे प्लॅटफॉर्मवरच जागा पकडण्यासाठी रात्रभर बसून राहतात. दरम्यानच्या काळात प्रवाशांना अनंत अडचणींचा सामना करावा लागतो. लहान मुलांचे दुधासाठी हाल होतात. त्यामुळे वरील बाबी लक्षात घेऊन, मनसे दिवा शहर कडून, शहर अध्यक्ष श्री. तुषार भास्कर पाटील यांच्या नेतृत्वाखाली काल रात्री १.०० ते पहाटे ४.३० वाजेपर्यंत फलाट क्रमांक ८ वरील दिवा- सावंतवाडी गाडीच्या प्रवाशांना चहा आणि लहान मुलांना दुधाचे वाटप करण्यात आले.
लहान मुलांना दुध व प्रवाशांना दोन घोट चहाचे मिळाल्याबद्दल प्रवाशांनी आनंद व्यक्त करून मनसे कार्यकर्त्यांचे आभार व्यक्त केले. हे काम फक्त राज ठाकरेंची मनसेचं करू शकते अशा उत्स्फूर्त प्रतिक्रिया प्रवाशांकडून ऐकायला मिळाल्या.
जाहिरात
जाहिरात
जाहिरात