संगमेश्वर- संगमेश्वर नजीकच्या धामणी येथील जि. प. आदर्श केंद्रशाळा नं. १ या ठिकाणी सामाजिक सेवेचा वसा अंगिकारलेले श्री श्री श्री महंत पीरयोगी भाईनाथजी महाराज मठाधीश कालभैरव मठ खोपोली यांच्या वतीने धामणी गावातील सर्व शाळांमधील गरजू व होतकरू मुलाना शालेय गणवेश, दप्तर, छत्री, वह्या, पेन, कंपासपेटी इत्यादी शैक्षणिक शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. तसेच मुलांच्या स्पर्धा परीक्षांसाठी महाराजांनी चांगली आर्थिक तरतूद केली.
सदर कार्यक्रमास स्वामीभक्त श्री.प्रभाकर शेठ घाणेकर, उपसरपंच श्री संगम पवार, ग्रामपंचायत सदस्या सौ. स्वाती सप्रे,प्राजक्ता घाणेकर, सौ प्रेरणा लिंगायत, सौ शर्मिला गुरव, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष केंद्र प्रमुख श्री जंगम, मुख्याध्यापक श्री गेल्ये,सर्व शिक्षक, श्री दिगंबर लिंगायत ( वार्ताहर) ग्रामस्थ विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
सदर कार्यक्रम उद्योजक श्री प्रभाकर शेठ घाणेकर यांच्या अथक प्रयत्नातून आणि प्रेरणेतून गेली १५ वर्षे अखंडपणे पार पडत आहे. कार्यक्रमाला स्वतः मठाधीश भाईनाथजी महाराज आणि त्यांचे भक्तगण उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. गुरव गुरूजी जि. प. शाळा धामणी नं.२ यांनी केले.