
पावस | मार्च ०१, २०२४.
सर्वसामान्य लोकांना प्रशासकीय कामात सहकार्य व्हावे या हेतूने निर्माण करण्यात आलेल्या विशेष कार्यकारी अधिकारी पदावर सामाजिक क्षेत्रात भाजपाच्या माध्यमातून कार्यरत असणाऱ्या कार्यकर्त्यांची निवड होणे हा निस्पृहपणे सेवाकार्य करणाऱ्या गौरवच म्हणावा लागेल.
पावस जि. प. गटात पात्र सर्व विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन करण्यासाठी व त्यांना सन्मानपूर्वक नियुक्तीपत्र व शिक्का प्रदान करण्यासाठी ज्येष्ठ कार्यकर्ते बंडूशेठ दाते, सुशांत (आप्पा) तोडणकर, तालुका सरचिटणीस सुशांत पाटकर, किसान मोर्चा तालुकाध्यक्ष जगन्नाथ पवार, तालुका चिटणीस संजय पाथरे, बूथप्रमुख प्रकाश गुरव, संतोष रेगे, सुमित तोडणकर, वैभव मेस्त्री, राजूदादा चव्हाण आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
नियुक्ती झाल्याबद्दल व नियुक्तीपत्र सन्मानपूर्वक दिल्याबद्दल निवड झालेल्या कार्यकर्त्यांनी पक्षाचे आभार मनात निष्ठापूर्वक केलेल्या कामाचे बक्षीस मिळाल्याची भावना व्यक्त केली. मा. सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. रविंद्रजी चव्हाण, मा. बाळासाहेब माने, जिल्हाध्यक्ष राजेशजी सावंत आदी श्रेष्ठींनी ठेवलेला विश्वास सार्थ ठरवण्यासाठी जास्तीतजास्त कार्य करण्यास आम्ही कटिबद्ध आहोत अशा प्रतिक्रिया दिल्या.