
डिजिटल दबाव वृत्त
छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारणार भूषण पाटील
शिवरायांचा छावा’ या चित्रपटाच्या ट्रेलरच्या सुरुवातीला छत्रपती संभाजी महाराज यांच्या भूमिकेत भूषण पाटील दिसत आहे. “स्वराज्याच्या सिंहासनाची जबाबदारी भार मोठी असते राणीसरकार” हा डायलॉग देखील ट्रेलरमध्ये ऐकू येतो. मुघलांनी जनतेवर केलेला अत्याचार देखील ‘शिवरायांचा छावा’ या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये दिसत आहे. या ट्रेलरला प्रेक्षकांची उत्तम पसंती मिळत आहे.
दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांच्या ऐतिहासिक चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळते. त्यांचे फर्जंद, फत्ते शिकस्त, पावनखिंड, शेर शिवराज, सुभेदार हे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले. आता दिग्पाल लांजेकरांच्या आगामी चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. दिग्पाल लांजेकर यांचा ‘शिवरायांचा छावा’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
चला तर जाणून घेवुया चित्रपटाची स्टार कास्ट
मृणाल कुलकर्णी, चिन्मय मांडलेकर, भूषण पाटील, तृप्ती मधुकर तोरडमल, प्रसन्न केतकर,अभिजीत श्वेताचंद्र, विक्रम गायकवाड, भूषण शिवतारे, अमित देशमुख, अवधूत गांधी,रवी काळे,राहुल देव, ज्ञानेश वाडेकर, ईशा केसकर, नंदिनी कान्हेरे, समीर धर्माधिकारी, दिप्ती लेले, सौरभ कुशवाह,बिपिन सुर्वे,आशुतोष वाडेकर,दादा पासलकर, सागर संत,शरद सिंह,राम आवणा, रणजित रणदिवे, नीता टिपणीस दोंदे,अमित मेहता, सायली सांभारे अशी तगडी स्टार कास्ट ‘शिवरायांचा छावा’ या चित्रपटात बघायला मिळणार आहे.