दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा म्हणत दुमदुमली माणगाव नगरी… दत्त मंदिर ते जन्मस्थान श्री दत्तदिंडी काढत अभिषेक पूजा व महापूजने झाले उत्सवाची सुरुवात..

Spread the love

माणगाव हायस्कूलचे विद्यार्थीही दत्तदिंडीत झाले सहभागी…

कुडाळ प्रतिनिधी:- श्री क्षेत्र माणगाव दत्त मंदिर येथे श्री परमपूज्य वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज यांची जयंती साजरी होत आहे या निमित्त मंदिराला संपूर्ण मंदिराला देखणी अशी फुलांची सजावट श्री भक्त सेवा मंडळ नरसोबाची वाडी येथील सेवेकरांनी गेले दोन दिवस मंदिर परिसरात साफसफाई करून झेंडूच्या फुलांनी संपूर्ण मंदिर सजवला आहे व तसेच आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे आज सकाळपासूनच श्री क्षेत्र माणगाव येथे सकाळी 7 ते 9 वाजता अभिषेक पूजा व महापूजा त्यानंतर 9 ते 10 श्री दत्त जयंती दत्त मंदिर ते जन्मस्थान परत दत्तमंदिर 10 ते 12 स्वर सखी भक्ती संगीत व नाट्यसंगीत सादरकरते मुग्धा गावकर व प्राची जठार 12.30 वाजता महानैवेद्य व आरती दुपारी 1 ते 3 वाजेपर्यंत महाप्रसाद 1.30 ते 2.30 एडवोकेट श्री दिलीप ठाकूर मालवण यांचा भक्ती संगीत व नाट्य संगीताचा कार्यक्रम संध्याकाळी 7 वाजता आरती.7.30 ते 9 ह. भ. प. श्री शरद बुवा घाग नरसिंहवाडी यांचे कीर्तन आणि रात्री 9 वाजता महाप्रसाद असा जयंती उत्सव कार्यक्रम दत्त मंदिर येथे होत आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page