
*देवरूख-* इन आर्ट वल्ड इंटरनॅशनल मॅगेझिन स्पर्धेत देवरुख न्यू इंग्लीश स्कूलचे कलाशिक्षक दिगंबर मांडवकर यांच्या चित्राची निवड झाली आहे. दिगंबर मांडवकर यांनी त्र्यंबकेश्वर मंदिर, तेथील घाट परिसर कॅनव्हासवर रेखाटले आहे.हे चित्र आता इंटरनॅशनल स्तरावरील मासिकाचे मुखपृष्ठ बनणार आहे.
इंटरनॅशनल स्तरावर ही ऑनलाईन स्पर्धा घेतली. आलेल्या हजारो चित्रांमधून फक्त चार चित्रकारांची चित्रे निवडली गेली यामध्ये एक दिगंबर मांडवकर यांच्या चित्राचा समावेश झाला आहे. या स्पर्धेत दिगंबर मांडवकर यांच्यासह अनुप सिन्हा,राजश्री नंदी, आर. पद्मजा या चित्रकारांचा समावेश आहे. स्पर्धेतील यशाबद्दल दिगंबर मांडवकर यांचे संस्थाध्यक्ष सदानंद भागवत, शिक्षकवृंद व तालुकाभरातील नागरीकांनी अभिनंदन केले.या आधी माडंवकर यांना देश, विदेशातील पुरस्कार मिळालेले आहेत. मांडवकर यांचे तालुकाभरातून अभिनंदन होत आहे.