जय श्रीराम!! सियावर रामचंद्र की जय!! घोषणांनी निनादले देवरूख!

Spread the love

संगमेश्वर तालुक्यातुन २५० रामभक्त अयोध्येला रवाना

देवरुख- २२ जानेवारीला अयोध्येला श्रीराम मंदिरात बालश्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाली.

▪️सर्वसामान्य भारतीय सश्रद्ध नागरिक आतुर झाले होते की, कधी एकदा अयोध्येत जायला मिळतय!

▪️सामान्य माणसांच्या याच भावनेचा आदर करत महाराष्ट्र भाजपने अशा रामभक्तांसाठी विशेष रेल्वेचे आयोजन केले. अशा पद्धतीची सोय होते आहे म्हंटल्यावर एक दिवसात संगमेश्वर तालुक्यातून दोन बसेस भरून बुकिंग झाले. आज या दोन बसेस देवरूख येथून रवाना करण्यात आल्या. सगळ्यांचे चेहरे आनंद आणि भक्तीभावाने नुसते फुलून गेले होते. जय श्रीराम!! सियावर रामचंद्र की जय, भारतमाता की जय, हर हर महादेवच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.

▪️चिपळूण संगमेश्वर विधानसभेचे निवडणूक प्रमुख प्रमोद अधटराव यांनी सर्व यात्रेकरुंना शुभेच्छा दिल्या. यावेळी नगराध्यक्ष मृणाल शेट्ये. तालुकाध्यक्ष रुपेश कदम; विनोद मस्के; माजी नगरसेवक संतोष केदारी; सुशांत मुळे; बबन किर्वे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

▪️संगमेश्वर पंचायत समितीचे गट विकास अधिकारी भरत चौगुले यांनी श्रीफळ वाढवून यात्रेला प्रशासनाच्या वतीने शुभेच्छा देऊन जास्तीत जास्त जनतेला हे भाग्य लाभावे अशी इच्छा व्यक्त केली.

▪️आज रात्री पनवेल येथून रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील १२०० यात्रेकरू अयोध्येला जाण्यासाठी रेल्वे प्रवास सुरू करणार आहेत.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page